खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शाहीर शिवाजीराव पाटील लिखित अहिराणी गीताचे युट्यूबर प्रकाशन

अमळनेर (प्रतिनिधी) शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या लेखणीतून साकारलेले धमाल कौटुंबिक अहिराणी गीताचे नाशिक येथे युट्यूबवर प्रकाशन सोहळा झाला. या गीताला खान्देशात उत्तम प्रतिसाद लाभत आहे. मेलोडीयस प्रोडक्शन या यूट्यूब चैनलवर हे गीत प्रसारित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शाहीर परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा खान्देश लोकरंग फाऊंडेशनचे अध्यक्ष व खान्देशातील सुप्रसिद्ध शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या सिद्धहस्त लेखणीतून एक धमाल विनोदी व कौटुंबिक पारंपारिक असे अहिराणी गीत साकारलेले आहे. ज्याचे शब्द आहेत माले सासरे किंमत नही व, या गीताचे नुकतेच नाशिक येथे मेलोडीयस प्रॉडक्शनच्या यूट्यूब यूट्यूब चैनलच्या स्टुडिओमध्ये भव्य स्वरूपात प्रकाशन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे निर्माते उदय पाटील तसेच सहनिर्माता रोहित गीताचे दिग्दर्शक व पटकथाकार गौरव कुलकर्णी, सुप्रसिद्ध गायिका मेघा मुसळे तसेच संगीत संयोजक कुणाल राऊळ, भागवत महाजन व शाहीर शिवाजीराव पाटील उपस्थित होते. शाहीर शिवाजीराव पाटील यांनी या अहिराणी गीताच्या माध्यमातून एका कुटुंबातील सोन्याची कथा मांडलेले असून या गीताला खान्देशात उत्तम प्रतिसाद लाभत आहे. मेलोडीयस प्रोडक्शन या यूट्यूब चैनलवर हे गीत प्रसारित करण्यात आले असून या गीताच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीचे व कौटुंबिक परिस्थितीचे उत्तम उदाहरण शिवाजीराव पाटील यांच्या गीतातून साकारले गेले आहे. यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे रिया राज यांनी. गीत प्रकाशन सोहळा नाशिक येथे मोठ्या थाटात झाला. लोकरंग फाउंडेशनतर्फे खान्देशातील सर्व अहिराणी बांधवांनी हे गीत जास्तीत जास्त पाहून यूट्यूब चैनलवर आपला अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button