खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
राजकीय

अमळनेर तालुक्यात लवकरच राजकीय भुकंप, नेत्यांना बसणार जोरदार हादरे

वर्षानुवर्ष सोबत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका क्षणात दुरावणार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यात पक्ष प्रवेशाचा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष सोबत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका क्षणात दुराणार असल्याने नेत्यांना याचा मोठा झटका बसणार आहे. एका मोठया पक्षातून दुसऱ्या एका मोठ्या राजकीय पक्षात हे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याने अमळनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका आणि त्यावर विधानसभेचे राजकीय भवितव्य ठरत असल्याने राजकीय गोटात मोठे खलबते सुरू आहेत. जिल्ह्यात अमळनेर तालुका हा महत्वाचा असल्याने याकडे जिल्ह्यासह राज्याचेहे लक्ष लागून असते. त्यामुळे येथील राजकीय हालचालींवर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांचेच लक्ष असते. त्यामुळे एका मोठ्या राजकीय पक्षाने आपल्या पक्षाला बळ देण्यासाठी संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी ते दुसऱ्या मोठ्या राजकीय पक्षातील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या दुखत्या नसवर बरोबर बोट ठेवून त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणणार आहेत. त्यामुळे अमळनेरसाठी हा मोठा राजकीय भूकंप ठरणार आहे.

नाराजींची तयार होतेय फौज

या पक्ष प्रवेशात एका मोठ्या पक्षाला दे धक्का देण्यात येणार आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत. पक्षासह नेतेही निष्क्रीय झाले, स्वतःचे पोट भरण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वापर केला जात आहे. त्यांच्याकडून योग्य वेळी न्याय दिला जात नाही. वर्षानुवर्ष सतरंजी गोळा करूनही ऐन निवडणुकीत डावलेले जाते. महत्त्वाची पदे देताना दुजाभाव केला जातो. घराचा वारस पुढे करण्यासाठी पदाधिकाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे किती दिवस हे सहन करायचे, बदल हा प्रकृतीचा नियम आहे, अशी समजूत करून घेत आता हे आजी माजी पदाधिकारी सोड चिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. तसेच गटातटाचे राजकरण वाढले असून पक्ष संघटन भरकटत जात आहे. योग्य दिशा आणि न्याय मिळत नसल्यामुळे ते एका मोठ्या पक्षात प्रवेशासाठी योग्य मुर्हूताची वाट पाहत आहे. अशी नाराजींची फौजच तयार झाली असून लवकरच ते पक्ष प्रवेशाचा बॉम टाकणार आहे. यामुळे कोणाला किती फायदा आणि कोणाला किती नुकसान होईल, हे लवकरच कळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button