अमळनेर (प्रतिनिधी) दुरुस्तीसाठी बाहेर काढून ठेवली मोटार व केबल चोरट्यांनी लांबल्याची घटना मांडळ येथे घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील मांडळ येथील राजेंद्र विजय चव्हाण यांच्या शेतातील बोअर मधील पाण्याची मोटार व ५०० फूट केबल दुरुस्तीसाठी बाहेर काढून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने १२ रोजी रात्री ती चोरून नेली. केबलची किंमत १७ हजार ५०० रुपये होती. चव्हाण यांनी फिर्याद दिल्यावरून मारवड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल भरत ईशी करीत आहेत.