पू. सानेगुरुजी पतपेढीचे संचालक युवराज चव्हाण तिसरे अपत्य प्रकरणी पायउतार

रघुनाथ मोरे यांच्या तक्रारीवरून सहाय्यक निबंधकांनी दिले आदेश

अमळनेर (प्रतिनिधी) पूज्य साने गुरूजी न.प. वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक तथा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांना तिसरे अपत्यप्रकरणी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अमळनेर यांनी अपात्र घोषित केले आहे. रघुनाथ रामभाऊ मोरे यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यातच पू.साने गुरूजी न.पा.वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती गटातून अमळनेर नगर पालिकेचे आरोग्य निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण हे संचालकपदी किरकोळ मतांच्या फरकाने निवडून आले होते. दरम्यान, रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी सहा.निबंधक (सहकारी संस्था),अमळनेर यांच्याकडे तक्रार करून युवराज श्रीपत चव्हाण यांनी तिसरे अपत्य असतानाही खोटे शपथ पत्र दाखल केल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी तक्रार केली होती. या तक्रारीवर युवराज श्रीपत चव्हाण यांना म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी दिली असतानाही त्यांनी आपले म्हणणे सहायक निबंधक यांच्याकडे सादर केले नव्हते. यामुळे अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांना असलेले तीन अपत्य बाबत रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी सादर केलेले पुराव्यांच्या आधारावर पू.साने गुरूजी न.पा.वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी चे नवनिर्वाचित संचालक युवराज श्रीपत चव्हाण यांना अपात्र करण्यात येत असल्याचा निर्णय सहा निबंधकानी दिला आहे. या निर्णयामुळे नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *