अमळनेर(प्रतिनिधी) करिअर कट्टा उपक्रमाचा प्रताप महाविद्यालयाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला असून नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयीन स्पर्धा ह्या २०२१-२२ मध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज, अमळनेरने सहभाग नोंदविला होता. करिअर कौन्सेलिंग सेंटरच्या अंतर्गत करिअर कट्टा या उपक्रमात वर्षभर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रताप कॉलेजला शासनाचे गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.शिरोडे, करिअर कट्टा समन्वयक डॉ.विजय तुंटे, सचिन खंडारे हे उपस्थित होते. या यशाबद्दल खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष हरि भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, संचालक डॉ.संदेश गुजराथी, डॉ.अनिल शिंदे, सीए निरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, विनोद पाटील, कल्याण पाटील, चिटणीस डॉ.ए.बी.जैन, डॉ.जयेश गुजराथी, उप प्राचार्य डॉ.एम. एस. वाघ, डॉ.जे.बी पटवर्धन,डॉ.जी.एच.निकुंभ,डॉ.कल्पना पाटील यांनी कौतुक केले.
शासनासोबत एम.ओ.यु. करार
दरम्यान, प्रताप महाविद्यालयाचा शासनासोबत एम.ओ.यु. करार झाला आहे. या करारामुळे विद्यार्थी उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण व सहकार्य मिळेल. स्टार्ट-अपला चालना मिळेल. उद्योजक संस्कृती विकसित होईल. ईनक्युबीशन केंद्र विकसित होण्यास मदत होणार आहे.