अमळनेर तालुक्यातील गावांना जाणवू लागल्या पाणी टंचाईच्या तीव्र झळा

दहा गावातील विहिरी केल्या अधिग्रहीत, अंचलवाडी व ढेकू खुर्द तांडा येथे टँकर मागणीचे प्रस्ताव

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील काही गावांना पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून दोन गावांचे टँकर पुरवण्याचे प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत.
अमळनेर तालुक्यात मे महिन्याचा तडाखा जाणवू लागला आहे. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असले तरी आतापासूनच काही गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यात तालुक्यातील भिलाली , मुडी दरेंगाव, टाकरखेडा, एकरुखी, रामेश्वर बुद्रुक , गडखाम्ब , मांजर्डी, धुपी, पळासदळे, दहिवद खुर्द या गावांना विहीर अधिग्रहण केल्या आहेत. तर अंचलवाडी व ढेकू खुर्द तांडा येथे टँकर मागणीचे प्रस्ताव आले, आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *