कामचुकार ग्रामसेवंकावर कारवाई करणारच; संघटनेतर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न – गटविकास अधिकारी

अमळनेर (प्रतिनिधी)-अमळनेर येथील ग्रामसेवकांना सोशल मीडियावर ग्रामसेवकांची लाज लज्जा अशासकीय भाषा वापरणाऱ्या गटविकास अधिकाऱ्या विरुद्ध ग्रामसेवक संघटने ने एल्गार पुकारला असून निवेदनाद्वारे बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे.
१३ व १६ रोजी अमळनेर चे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सोशल मीडियावर व वैयक्तिक व्हाट्सएप ग्रुपवर निलंबन,चौकशी प्रस्तावित करण्याबाबत धमक्या दिल्या होत्या. प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पदाचा अतिरेक केला असल्याचा आरोपही संघटनेने निवेदनाद्वारे केला आहे.तसेच आचार संहिता संपल्यानंतर वेळोवेळी मागणी केल्यावर देखील प्रशासकीय विनंती बदल्या शासन आदेश असतानाही ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी संवर्गाच्या बदल्या आपण केलेल्या नाहीत, “ड” याद्या सर्वेक्षणाचे कामात कुठलाही आदेश नसताना कामकाज सुरू आहे परंतु तांत्रिक अडचणींमुळे सदर काम धीम्या गतीने सुरू आहे तरी सोशल मीडियावर ग्रामसेवकांबाबत असंविधानिक व अशासकीय (लाज लज्जा )भाषेचा वापर केला जात आहे. तरी असेही पत्रकात म्हटले आहे. या मानहानी मुळे ग्रामसेवकांचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे हे प्रकार बंद करावेत अन्यथा बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील,सचिव संजय सैंदाने,मानद अध्यक्ष जि.एम.पवार, एन.एस.पाटील,एम एन.ठाकूर,माजी अध्यक्ष दिनेश साळुंखे, डी.के.मोरे, यांच्यासह ६४ ग्रामसेवकांनी दिला असून निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ , सभापती वजाताई भिल, व संघटनेच्या राज्यध्यक्षना देण्यात आले आहे.कामाच्या बाबतीत अमळनेर तालुका मागे असल्यामुळे कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करणे सुरू केल्याचा राग आल्याने संघटनेतर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र माझी कारवाई सुरूच राहणार आहे त्यात माघार घेणार नाही.
संदीप वायाळ,प्रभारी गटविकास अधिकारी,पंचायत समिती अमळनेर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *