खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नगरपालिकेच्या निवृत्त शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न सुटल्याने मुख्याधिकाऱ्यांचा केला विशेष सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेच्या निवृत्त शिक्षकांच्या वेतनासाठी नगरपालिकेकडून नगरपरिषद शिक्षण मंडळास नियमाप्रमाणे 10 टक्के हिस्यांची रक्कम मिळण्यास विलंब होत असताना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी ही रक्कम देऊन निवृत्त शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न सोडवला आहे. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त वेतन धारक आणि कर्मचारी वृंदाच्या वतीने मुख्याधिकारी सरोदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी हाजी कादर जनाब, सत्तार मास्तर, साहेबराव त्र्यंबक गुरुजी, हमीद अन्सारी, हमीद अमीर खाटीक, सावे गुरुजी, राजपूत यांच्या हस्ते मान्यवरांना बुके शाल व अभिनंदन पत्र देण्यात आले. यावेळी नागरी हीत दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांचाही सत्कार करण्यात येऊन आमदार अनिल पाटील यांनी वेळोवेळी अनमोल सहकार्य केल्याने त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले. तर लेखपाल सुनिल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जावेद अख्तर, राजपूत यांनी केले. आभार रविंद्र पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न. प .शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button