आमदार शिरीष चौधरी अपघातातून बाल बाल बचावले..

अमळनेर– अमळनेर हुन नंदूरबार कडे जात असतांना आमदार शिरीष चौधरी यांची गाडी क्रमांक एम.एच.३९ ए.ए.८३८३ चा अपघात झाला. धुळे-नंदूरबार राज्यमार्गावर अपघात झाला आहे. नंदूरबारजवळील वावद गावाजवळ हा अपघात झाला असून एका भरधाव ट्रकने आमदार शिरीष चौधरी यांच्‍या गाडीला कट मारल्याने शिरीष चौधरी यांची गाडी पलटी झाली.नशिब बलवत्तर होते म्हणून ते वाचले.वेळीच गाडीच्या आतली एअर बॅग निघाल्याने ते सुदैवाने बचावले.या अपघातात आमदार शिरीष चौधरी यांच्‍या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या सोबतचे इतर तीन जण जखमी आहेत. जखमींना नंदूरबार येथील खासगी रुग्णालया मध्ये उपचाराकरीता दाखल केले असून डॉ. यांनी उपचार सुरू केले आहेे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *