सभापती बंगला झाला गांजोळी,भंगोळी चा अड्डा..

लोकांना सांगी ब्रह्मज्ञान मात्र स्वतः कोरडे पाषाण.

अमळनेर पंचायत समिती सभापती बंगला…

स्वच्छ भारत अभियान राबविणारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अन भारतीय जनता पार्टी ची देशासह राज्यात,जिल्ह्यात,तालुक्यात,सर्वत्र सत्ता आहे.जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर परिषद त्यांचेच ताब्यात आहे तरी देखील पंचायत समिती सभापती बंगला ओस पडला असून त्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या बंगल्यात ‘भूत’काळात एका सभापती चा मृत्यू झाला होता म्हणून या ‘भूत’ बंगल्याच्या अंधश्रद्धा पोटी या बंगल्यावर कुणीही राहायला येत नाही. ही इमारत राहण्यायोग्य असतांना देखील मागिल काळात एका तथाकथित सभापती ने दहा हजार रुपये महीना घर भाडे लाटण्याकरीता सभापती बंगला राहण्यायोग्य नाही असा दाखला अभियंताना द्यायला भाग पाडले होते.

घाणीचे साम्राज्य…

या भर रस्त्यावरील मद्यवर्ती ठिकाणी असलेला हा सभापती बंगला ओस पडला असून त्या प्रशस्त वास्तू असतांना देखील दहा हजार रुपये घरभाडे भत्ता घेऊन अनेक सभापती ताजे तवाने झाले आहेत. या बंगल्या जवळ दारू पिणारे, सिगारेट फुंकणारे,गांजा ओढणारे, व पत्ते कुटणारे,कामसूत्र खेळणारे,दिवसा रात्री असतात या बंगल्या अवती भोवती कुणालाही विरोध न करता इतक्या प्रमाणावर निरोध पडले आहेत की येथे दुसरे काही चालत असेल याची शंका येत आहे. तसेच स्वच्छता गृह म्हणून वापरले जाते याचा प्रत्येक्षदर्शी पुरावा आहे. तेथे कचऱ्याचा ढीग आहे,हा सभापती बंगला भूत बंगला असल्याचा भीती पोटी ओस पडल्याने या घाण व कचऱ्यातून हा बंगला कधी मुक्त होईल लागलेली भूतबाधा दूर करायला कोण भगत,भक्तीन, तांत्रिक,मांत्रिक येईल या कडे लक्ष लागले आहे.

 लघुशंका करतांना एक सुज्ञ नागरीक

तसेच अमळनेर गटविकास अधिकारी यांनी सरकारी तिजोरीतला पैसा घरभाडे भत्ता वाचविण्याच्या दृष्टीने या सभापती बंगल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे जन माणसात बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *