खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

गड्खांब येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहामध्ये ग्रामस्थ भक्तीत तल्लीन

२७ रोजी हभप शशिकांत महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गड्खांब येथे २० एप्रलिपासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात रोज सकाळी ५ वाजता काकडा आरती,सांयकाळी ६ वाजता हरिपाठ तर रात्री साडे आठ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
गडखांब येथीलग्रामस्थ व श्री जयहरी भजनी मंडळाने महादेव मंदिर व प्रभू राम भक्त हनुमान मंदिरावर या कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. यात दि. २० रोजी हभप नाना महाराज दोंडाइचा,दि. २१ रोजी हभप किशोर महाराज सोनखेडीकर,दि. २२ रोजी हभप जयेश महाराज नगावकर,दि. २३ रोजी गोकुळ महाराज पिंपळीकर,दि. २४ रोजी हभप भाईदास महाराज देवगाव,दि. २५ रोजी हभप भूषण महाराज अंबापिंप्री,दि. २६ रोजी शशिकांत महाराज भवरखेडा तर सांयकाळी पालखी व दिंडी सोहळा होणार आहे. तर दि. २७ रोजी हभप शशिकांत महाराज भवरखेडा यांचे काल्याचे कीर्तनाचे आयोजन सकाळी करण्यात आले आहे. दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी कीर्तन सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button