खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

चोरट्याने खांबावरील ६० हजारांच्या तारा चोरून विज कंपनीला दिला शॉक

अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्याने चक्क विद्युत खांबावरील सुमारे ३६ गाळ्यातील एलटी लाईनच्या ६० हजार रुपये किमतीच्या तारा चोरून वीज कंपनीला जोराचा शॉक दिला. ही घटना अमळनेर तालुक्यातील सडावन व सुंदरपट्टी शिवारात १७ रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सडावण व सुंदरपट्टी शिवारातील तीन विविध ठिकाणी सुमारे ३६ गाळ्यातील विजेच्या खांबावरील ६० हजार १५४ रुपये किमतीचं अल्युमिनियम तारा चोरीस गेल्याची माहिती वरिष्ठ तंत्रज्ञ अविनाश रणदिवे यांनी सहाययक अभियंता विजय माधवराव माळी यांना फोन वरून कळवले. अभियंता माळी व प्रधान तंत्रज्ञ प्रवीण पाटील यांनी खात्री केल्यानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल संदीप धनगर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button