अमळनेर पोलिसांनी बेवड्यांचा अड्डा केला उध्वस्त….

अमळनेर– खळेश्वर कंजरवाडा, झामी चौक भागात तसेच जानवे येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे १६ हजार रुपयांची दारू,रसायन आणि ७ लोखंडी ड्रम जप्त करून चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तीन महिलांसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१५ रोजी पहाटे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर,ए.पी.आय. गणेश चव्हाण, ए.एस.आय. प्रभाकर पाटील,पोलीस नाईक किशोर पाटील,विजय साळुंखे, रवी पाटील, योगेश महाजन,नाझीमा पिंजारी , रेखा ईशी, यांनी छापा टाकून रेखाबाई जितेंद्र कंजर हिच्याकडे ८०० रुपयांची २० लिटर दारू,६००० रुपये किमतीचे कच्चे रसायन, ३ लोखंडी ड्रम, तर मिनाबाई श्रावण कंजर हिच्याकडे ४०० रुपयांची १० लिटर गावठी हातभट्टीची दारू, ७००० रुपयांचे कच्चे रसायन, ४ लोखंडी ड्रम, असा माल जप्त करण्यात आला.तर झामी चौकातील पाण्याच्या टाकी जवळ देशी व संत्रा दारू विकताना गजानन श्रावण ठाकूर याला पकडण्यात आले त्याच्याकडे १९२४ रुपयांच्या ३७ क्वार्टर जप्त करण्यात आल्यात तर जानवे येथे द्वारकाबाई शाळीग्राम पारधी हिला गावठी दारू विकताना पकडण्यात आले.तिच्याकडून ४०० रुपयांची १० लिटर गावठी दारू व रसायन जप्त करण्यात आले नाजीमा पिंजारी व रेखा ईशी यांच्या फिर्यादीवरून हातभट्टी चालवणे व बेकायदेशीर दारू विकण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *