खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मारवड रस्त्यावरील राम मंदिरात दोन वर्षानंतर रामनवमी साजरी

मंदिरात जय श्रीरामचा जयघोष,सकाळपासून भाविकांची गर्दी

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनानंतर दोन वर्षांनी शहरातील प्रताप कॉलेज समोरील मारवड रस्त्यावरील राम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच उपस्थित भाविकांनी जय श्रीरामचा जयघोष केला.
मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी होती. तसेच प्रताप शेटजींचे नातू महेश अग्रवाल व त्यांच्या पत्नी मुलगा महेंग अग्रवाल, पुजारी सारंग कुलकर्णी, सेवेकरी महेंद्र परदेशी, सत्यवान महाजन, सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र चौधरी तसेच अनेक कार्यकर्ते व सेवकरी हजारो संख्येने रामाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. भक्तांसाठी वॉर्ड क्रमांक एकचे नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्यातर्फे मोफत थंड सरबत वाटप केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button