खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.विजय तुंटे यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्षपदी प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभाग प्रमुख, प्रा.डॉ.विजय तुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले आहे.
प्रताप महाविद्यालयातील प्रा. तुंटे यांनी २० संदर्भग्रंथ, संशोधक मार्गदर्शक, विविध चर्चासत्रे व परिषदामध्ये साधन व्यक्ती म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. एक चिंतनशील वक्ता म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. एक विद्यार्थीप्रिय आणि समाजाभिमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे खान्देश शिक्षण मंडळ संचालक मंडळ व प्राचार्य पी.आर. शिरोडे, प्राचार्य प्रमोद पवार यांनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button