मारहाण प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आठ जणांना सुनावली १ वर्ष कैदेची शिक्षा..

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाने शुक्रवारी मारहाण केल्या प्रकरणी आठ जणांना एक वर्ष शिक्षा सुनावली आहे.
तालुक्यातील येथील दोन भावात जैतपीर येथे प्रॉपर्टीच्या हिस्सा बाबतीत १८/६/२०१२ रोजी किरकोळ स्वरूपात वाद झाला होता.त्यामुळे संतापलेल्या केशव चा भाऊ पंडित देवराज यांनी १९ रोजी नातेवाईकांना गावी बोलावत भांडण केले. यात झालेल्या भानगडीत फिर्यादी केशव गंभीर देवराज व त्याच्या दोन मुलांना मारहाण करण्यात आली होती. त्यात केशव याच्या डोक्यावर गुप्तीने गंभीर प्रहार केला होता तसेच लोखंडी पाईप च्या सहाय्याने तब्बल आठ जणांनी केशव यांच्या घरात घुसून लोखंडी रॉड, गुप्ती, लोखंडी पाईप आदिनी मारहाण केली होती त्यात केशव गंभीर जखमी झाला होता याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता व याबाबत तपास तपासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.जी.साटोटे यांनी केला होता. त्यात आरोपी जितेंद्र विरभान ब्राह्मणे लोण ता.भडगाव , पंडित रामदास हाडिंगे, रघुनाथ रामदास हाडींगे दोन्ही रा पिंपरखेड ता भडगाव, पंडित गंभीर देवराज, विनोद पंडित देवराज रा जैतपीर ता अमळनेर,दत्तू पंडित हाडींगे रा पिंपरखेड ता भडगाव व मिथुन रामदास गोळे रा बोरगाव ता अमळनेर यांचा आरोपीत समावेश होता याबाबत सरकारी वकील राजेंद्र चौधरी यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी तसेच त्याचा मुलगा, आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली.
आरोपीना कलम ३२४ मध्ये एक वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी ५०० रु दंड,१४३ मध्ये ६ महिने शिक्षा आणि प्रत्येकी ५०० रु दंड, १४८ व १४९ मध्ये एक वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी ५०० दंड अशी शिक्षा सुनावली व दंड न भरल्यास एक महिना साधी शिक्षा अशी शिक्षा जिल्हा व अति सत्र न्या आर.पी. पांडे यांनी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *