खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

खाशि’च्या मतमोजणीची सुटली आढी, रविवारी विजयी उमेदवार उभारणार गुढी

खाशि’च्या मतमोजणीची सुटली आढी, रविवारी विजयी उमेदवार उभारणार गुढी

शहरातील इंदिरा भवन येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी

अमळनेर (प्रतिनिधी ) खा.शि चे अध्यक्ष अनिल कदम यांनी संस्थचे वकील यांच्याशी चर्चा करून, मंगळवारी सायंकाळी विद्यमान संचालक मंडळ आणि निवडणुकीतील सर्व उमेदवार यांच्याशी सल्लामसलत करत मतमोजणीचा आदेश, निवडणूक उपसमितीला दिला आहे, त्यानुसार निवडणूक उपसमितिचे अध्यक्ष पंडित चौधरी यांनी ३ एप्रिल रोजी शहरातील इंदिरा भवन येथे सकाळी आठ वाजल्या पासून मतमोजणी केली जाईल, असे जाहीर केले, यामुळे विजयी उमेदवार गुढी पाडव्याच्या दुसर्‍याच दिवशी आपल्या विजयाची गुढी उभारणार आहेत. बैठकीत सुरवातीला अध्यक्ष अनिल कदम यांनी धर्मदाय आयुक्त यांचा निकालानंतर उध्दभवलेली परिस्थिती आणि मतमोजणीचा पेचप्रसंग उपस्थित सर्व उमेदवार यांच्या समोर मांडला. त्यांनतर मतमोजणी घेण्या संदर्भात आलेल्या उमेदवारांची मते जाणून घेतली, उपस्थित सर्व उमेदवारांनी एकमुखाने मतमोजणी साठी संमती दिल्याने अध्यक्ष कदम यांनी 3 एप्रिल ही तारीख मतमोजणी साठी निश्चित केली, यावेळी सहकार,आणि आशीर्वादचे पॅनल उमेदवार अध्यक्ष अनिल कदम,उपाध्यक्ष कमळ कोचर, तर संचालक कल्याण पाटील,योगेश मुंदडा, डॉ. संदेश गुजराती, प्रदीप अग्रवाल, डॉ. बीएस पाटील, जितेंद्र जैन,हरी अण्णा,नीरज अग्रवाल, उमेदवार विनोद पाटील, बापू वाणी, भरत कोठारी,प्रसाद शर्मा हेमंत पवार, प्रवीण जैन,जितेंद्र देशमुख, संतोष पाटील, जितेंद्र झाबक, किसन पाटील, विक्रम शहा, नगीन लोढा, बी आर बडगुजर,आणि निवडणूक उपसमती चे पंडित चौधरी, डॉ बी आर बाविस्कर, दिनेश नाईक,महाजन आदी मान्यवर उपस्थित होते

तब्बल ४७ दिवसानंतर होणार मतमोजणी

खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक १३ फेब्रुवारी रोजी झाली होती, त्यानंतर तब्बल ४७ दिवसानंतर मतमोजणी केली जाणार आहे, मतमोजणी होईल की निवडणूक रद्द होईल याबाबत चर्चांना उधाण आले होते.

उच्च न्यायालयात धाव आणि बैठकीचा डाव

धर्मदाय आयुक्त यांच्या आदेश आल्यानंतर ही मतमोजणी ची तारीख जाहीर न झाल्याने विद्यमान संचालक कल्याण पाटील, आणि सहकार चे उमेदवार हेमंत पवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती,त्यानंतर खऱ्या अर्थाने चक्र वेगाने फिरली, बैठकीचे सत्र सुरू झाले, दोन्ही पॅनल च्या उमेदवारांनी एकमेकांशि संवाद साधला आणि ३० मार्च रोजी सकाळी महत्त्व पूर्ण बैठक संपन्न झाली, त्यानंतर सायंकाळी पुन्हा सर्व उमेदवारांची बैठक बोलावून मतमोजणी वर चर्चा झाली आणि अखेर मतमोजणीची तारीख निश्चित करण्यात आली.

अशी होईल मतमोजणी, ५० कर्मचारी नियुक्त

मतमोजणी च्या दिवशी सकाळी अध्यक्ष, उपाध्यक्ष विश्वस्त पदांची मतमोजणी होणार आहे, त्यानंतर कार्यकारी संचालक पदाची मतमोजणी होणार आहे, मतमोजणीसाठी ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button