मंगळ जन्मोत्सवापासून मंगळ ग्रह मंदिरात सुरू होणार पालखी सोहळा

बुधवारी भव्य नित्यमंगल पालखी शोभायात्राअमळनेर (प्रतिनिधी)येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे बुधवारी (१९ सप्टेंबर) रोजी पहाटे सहा वाजता श्री मंगळ जन्मोत्सव आहे.
या सर्वार्थाने मंगल दिना पासून श्री मंगळदेव ग्रह मंदिरात श्रीपालखी उत्सवास सुप्रारंभ होत आहे. त्यानंतर दर मंगळवारी श्री मंगळदेव ग्रह मंदिरात सायंकाळी हा पालखी उत्सव होईल.
या पार्श्वभूमीवर १९ सप्टेंबर रोजी पालखी उत्सवातील पालखीची शोभायात्रा निघणार आहे. सकाळी सव्वा आठ वाजता शोभा यात्रेस वाडीपासून प्रारंभ होईल. या यात्रेत नित्यानंद फाउंडेशन
परिवाराचे महाराष्ट्रातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या भव्य “श्री नित्यमंगल पालखी शोभायात्रेत”शाळा/महाविद्यालय विविध संस्थेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी पारंपारिक वेशात मोठ्या
संख्येने सहभागी होऊन आपल्या शहराच्या उज्वल धार्मिक परंपरेच्या एका नवीन अध्यायाचे साक्षीदार व्हावे.

या शोभायात्रेत आपल्या शाळा / महाविद्यालय / संस्थेचा ट्रॅक्टर किंवा बैलगाडे रूपी शोभारथ,धार्मिक जिवंत आरास, कलशधारी  मुली/महिला आदींसह सहभागी व्हावे. ढोल-लेझीम पथक, वारकरी तथा भजनी मंडळे आदींनीही सहभागी व्हावे.असे जाहीर आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
शोभायात्रेचा मार्ग :- वाडी – सराफ बाजार – दगडी दरवाजा – स्व. पन्नालालजी जैन चौक – कोंबडी बाजार – निकुंभ हाईट्स – सुभाष चौक – पाच कंदील – मोठा बाजार फरशी रोड – चोपडा नाका मार्गे श्री मंगळदेव ग्रह मंदिरात सांगता होईल.
—————————————————-
देशातील खूपच मोजक्या मंदिरात नियमितपणे पालखी उत्सव होतो . त्या श्रेयनामावलीत आता श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा समावेश होतो आहे.त्यासाठी मुंबई येथून अतिशय सुंदर पालखी तयार करवून आणली आहे. 
                               अध्यक्ष

डिगंबर महाले, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *