जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली मुख्याधिकाऱ्यांची प्रधान सचिवांकडे तक्रार

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली मुख्याधिकाऱ्यांची प्रधान सचिवांकडे तक्रार

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करत नमुना क्र ६४ वर नागराध्यक्षांची सही घेतने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या माजी नगरसेविका कल्पना चौधरी यांची प्रधान सचिवांकडे व नगरविकास मंत्रीकडे तक्रार केली आहे.
चौधरी यांनी १० डिसेंबर २०१८ रोजी नगराध्यक्षांना नमुना क्र ६४ वर सही करायचे अधिकार नसल्याबाबत शासनाचे आदेश व धोरण असल्याचे निदर्शनास आणून देत तक्रार केली होती. त्यास अनुसरून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तक्राराची दखल घेत तात्काळ जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना नगराध्यक्षांना सही करण्याची गरज नसल्याचे आदेशीत केले होते. त्यास अनुसरून आर्थिक व्यवहारात सही करण्यास मिळत नसल्याने काही नगराध्यक्ष कोर्टात गेले होते. नगरपरिषदेचे सर्व धनादेश हे देयक क्र.६४ वर सही करूनच दिले जात असल्याने नगराध्यक्षाचे विशेष नुकसान होत होते. त्यामुळे ते न्यायालयात गेले होते. परंतु तरी देखील कुठलेही स्थगिती त्यांना मिळाली नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि ११ मे २९२१ च्या पत्रात म्हटले आहे. तरी देखील मुख्याधिकारी सरोदे यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेशाची पायमल्ली करत नमुना क्र ६४ वर नागराध्यक्षांची सही घेतल्याचे निदर्शनास आले आहे. तरी घडलेला प्रकार गंभीर आहे. प्रशासनातीलच जबाबदार अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानत नसतील तर हे अतिशय निदनिय व गंभीर असल्याचे मत कल्पना चौधरी यांनी व्यक्त करत नगरविकास मंत्री, प्रधान सचिव नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

जाहीरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *