घरफोडीत चोरट्यांनी ८४ हजाराच्या सोन्या, चांदीच्या देवांच्या मूर्ती, मंगळसूत्र लांबवले

अमळनेर ( प्रतिनिधी ) शहरातील गायत्रीनगरात घरफोडी करून चोरट्यांनी ८४ हजार ७०० रुपये किमतींचे सोन्या चांदीच्या देवांच्या मूर्ती तसेच मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील जय योगेश्वर हायस्कूल जवळील गायत्री नगरातील रहिवाशी सुचेता अरुणराव साळुंखे यांच्या घरात बुधवारी ते गुरुवारी सकाळपर्यंत चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी ८४ हजार ७०० रुपये किमतींचे सोन्या चांदीच्या देवांच्या मूर्ती तसेच मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ शरीफ पठाण करीत आहेत.

जाहीरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *