फासावर लटकताना “वेद”ना ‘त्याने’ भोगली, गिदड्यांनी रात्रीच प्रॉपर्टी केली मोकळी !

फासावर लटकताना “वेद”ना ‘त्याने’ भोगली, गिदड्यांनी रात्रीच प्रॉपर्टी केली मोकळी !

मुन्नाभाई एमबीबीएस’ला हाताशी धरून प्रॉपर्टी घेणाऱ्यांनी केली ‘कोतवालकी’

‘त्या’ आयत्या बिळातील नागोबांच्या बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या !

अमळनेर (प्रतिनिधी) कुबेराच्या भंडाऱ्याचा सेवेकरी आणि मोक्याच्या जागेवरच्या प्रॉपर्टीचा तो धनी होता.. रोज भिऊ नको मी तुझ्या पाठीशा आहे, अशी साद होती…म्हणून त्याचे ‘राज’ होते..पण वासे फिरल्याने स्वतःला फासावर लटकवून घेतले. कुटुंब उघड्यावर आले. याची कोणाला खंत नाही, उलट प्रॉपर्टीच्या हपापलेल्यांनी त्याच्या मृत्यूचेही भांडवल करीत रात्रोरात्र त्याची प्रॉपर्टी मोकळी केल्याचा ड्रामा चांगलाच रंगवला. या ड्राम्यात प्रॉपर्टी घेणाऱ्यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला हाताशी धरून ‘कोतवालकी’ करीत प्रॉपर्टी हडप करणाऱ्यांना इंगा दाखवताच रात्रीचा खेळ झाला..आणि ‘राज’ की बात ‘राज’ के साथ दफनाई, मगर ‘खबरीलाल’ की नजरसे बात न छुपपाई….और ‘राज’ की कहाणी यहा से शुरू हुई…

जाहीरात

जागतिक महिला दिनाच्या दिवशी सर्वत्र महिलांचा जागर होत असताना ‘ती’ मात्र अस्वस्थ होती. अनेकदा कॉल करूनही पती फोन उचलत नाही म्हणून कासावीस होती, या मागचे ‘राज’ काय म्हणून जवळच्या नातेवाईकाला घरी पाठवले. त्यांनी घरी येऊन पाहिल्यावर ‘राज’ उघड झाले. पतीने फासावर लटकून देहलोकी गेल्याचा सांगावा आला. आणि तिच्या चेहऱ्यावरचं “स्मित” हास्यच गेले.. येथून सुरू झाला ड्रामा आणि उलगडू लागली एक एक कडी….
काही वर्षांपूर्वीच त्याची नोकरी गेली.. सुखी संसारातून कुंकू पुसले गेले.. सोबतीला होतं अनमोल ‘रत्न’…तेही जाईल म्हणून पुन्हा हळद हसली.. साथ लाभली.. वेलीवरही फुलला वंशाचा दिवा.. होईल प्रकाश, उजळेल रत्न…पण कसला प्रकाश आणि कसला उजेड.. सारंच अंधारलं गेलं. प्रॉपर्टीच्या आजूबाजूच्या आयत्या बिळातही काही नागोबांनी फना वर काढल्या. काय करावं काही सूचत नव्हते. हे नागोबाही नको आणि प्रॉपर्टीही नको म्हणून ती विकायला काढली. ती घेण्यासाठी ‘प्रसन्न’ मनाने ‘केजरीवाल’ पुढे आले. त्यांनी कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा कवडीमोल भावात सौदा केला. नागोबांना हकलण्याची जबाबदारीही घेतली. काही पैसा मिळाला, काही राहिला. सारे सोडून तो बेघर झाला. एका अर्पाटमेंटमध्ये संसार थाटला. पुढे शिक्षणाच्या पंढरीत जाऊन राहिला. तरी साडेसाती काही पिछा सोडेना. कधी शिक्षणाच्या पंढरी ते कधी सानेगुरुजींच्या भूमित येणे-जाणे सुरू होते. लक्ष्मी रुसली होती..देणी वाढली होती. त्यातच काही देणाऱ्यां घेणाऱ्यांनी मारहाण केल्याने अपमानाच्या पिडेत फासावर लटकवून घेत स्वतःची सुटका करून घेतली. मरणाने तरी सुटका होईल, असे त्याला वाटले असेल, पण मरणानंतरही त्याचे भांडवल झाले.

ती सुसाईड ‘नोट’ आणि प्रॉपर्टीवर हातोडा !

तो फासावर लटकल्यानंतर त्याची चितेची आग विझत नाही तोपर्यंत काहींनी आपले इंगित साधण्यास सुरुवात केली. त्यात ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ही स्वार्थ साधत असल्याने त्याचे अधिक दुख आहे. त्यांना पाठ सोडून गेल्याचे दुख नाही, पोट भरले पाहिजे, असे वर्तन असल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. ‘राज’ की बात ही आहे, सुरुवातीला त्याच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही, पण दुसऱ्या दिवशी सुसाईड नोट आढळल्याचे सांगून त्याच्या ‘लक्ष्मी’ ने थेट पोलिस ठाणे गाठले. त्यात त्याला छळणाऱ्यांची आणि आयत्या बिळावरील नागोबांची नावे असल्याचे समोर आले. त्यांच्या फना आताच ठेचल्या पाहिजे म्हणून गारुडीचा खेळ मांडला गेला. या नागांना “हैद्राबादी” टोपलीत पकडून ठेवले. ऐरवी फना काढणाऱ्या या नागांच्या फना ढिल्या झाल्या. आम्ही हे बिळ सोडून देतो, असे लिहून दिल्याने त्यांची सुटका झाली आणि इकडे रातोरात त्यांचे बिळ पाडण्यास सुरुवात झाली. जे जिवंतपणे झाले नाही, ते त्याच्या मरणाच्या दोनच दिवसात या प्रॉपर्टीच्या सपेरांना जमले. असे त्या सुसाईड ‘नोट’ मध्ये काय होते, गुन्हाही दाखल झाला नाही आणि प्रॉपर्टीही मोकळी झाली. या सुसाईड ‘नोट’चा “गुरू” कोण शेवटी ‘राज’ की बातच ‘राज’ राहिली, तरी समजनेवालो को इशारा काफी है……

और एक ‘राज’ की बात…

आयत्या बिळातील नागोबांना रगड रक्कम देऊन सोडण्याची विनंती त्याने मरणा आधी केली होती. परंतु यांच्याही फना ताट असल्याने त्यांनी त्याला फुसकाऱ्या मारल्या. आता तो फासावर लटकल्याने “हैद्राबादी” जलेबी खाऊन ताबा सोडण्यास संमती दिली. यासाठी जलेबीची पैसेही द्यावे लागले आणि तो देत असलेले दहा लाखही गेले, म्हणजे बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या, अशी यांची गत झाली आहे. तर दुसरीकडे यांनी ताबा सोडण्याचे लिहून दिले असले तरी या आधीच ते “कोर्टात” गेले आहे. त्यामुळे ही प्रॉपर्टी कोणत्या बेसवर पाडली की पाडण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भविष्यात हे प्रकरण संबंधितांच्या चांगलेच अंगलट येणार आहे, ऐवढे मात्र निश्चितच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *