चना खरेदीचा शासकीय गोदामात शुभारंभ, ५२३० रुपयांचा हमीभाव
१३६३ शेतकऱ्यांनी नोंदणी, निंभोऱ्याच्या शेतकऱ्याच्या माल खरेदीने केला शुभारंभ

अमळनेर (प्रतिनिधी) केंद्रशासनाच्या हमीभाव योजनेनंतर्गत नाफेडच्या माध्यमातून गुरुवारी चना खरेदीचा शुभारंभ शासकीय गोदामात जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील व बाजार समिती प्रशासक तिलोत्तमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ५ हजार २३० रुपये शासकीय हमीभाव देण्यात आला.
हमी भाव योजनेंतर्गत १३६३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून हेक्टरी १३ क्विंटल माल खरेदी करण्याची मर्यादा आहे. प्रथम शेतकरी निंभोऱ्याचे भालेराव पाटील यांचा हरभरा मोजताना जयश्री पाटील व तिलोत्तमा पाटील यांनी काटा पूजन केले. भालेराव पाटील यांचा टोपी रुमाल देऊन मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील यांनी सत्कार केला. त्याच प्रमाणे प्रशासक संजय भिला पाटील यांची मराठा समाज पतपेढीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, प्रशासक अलीम मुजावर, ज्ञानेश्वर पाटील, सुधाकर धनगर, उमाकांत पाटील, रावसाहेब पाटील, गौरव पाटील, गिरीश पाटील, व्यवस्थापक संजय पाटील, शासकीय गोदाम साठा अधीक्षक नीरज पाटील, ग्रेडर सुभाष पाटील , कैलास बोरसे , भिकन पवार , सतीश पाटील उपस्थित होते.
२९ मे खरेदीची अंतिम मुदत
खरेदीची अंतिम मुदत २९ मे २०२२ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नावे नोंदवून आपला योग्य माल विक्रीस आणून शासकीय हमी भाव योजनेचा लाभ घ्यावा असेल आवाहन मुख्य प्रशासक संजय पाटील यांनी केले आहे. प्रथम शेतकरी भालेराव पाटील यांनी एकरला विक्रमी उत्पन्न १३ क्विंटल घेतले आहे. आणि शासनाची मर्यादा हेक्टरी १३ क्विंटल असल्याने मर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी केली आहे.