शिक्षिका प्रेरणा सराफ यांचा मुंबईत राज्यस्तरीय विद्या रत्न पुरस्काराने गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) जीएस हायस्कूलच्या शिक्षिका प्रेरणा सुजित सराफ यांना मुंबई येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका विद्या रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्यस्तरीय नारी शक्ती सन्मान नारी गौरव पुरस्कार वितरण सांस्कृतिक सभागृह मुंबई येथे ८ मार्च रोजी पार पडला. या वेळी प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, प्रसिद्ध विचारवंत, श्याम सुंदर महाराज, पत्रकार, लेखक कवी वक्ता रमेश आव्हाड, इंटरनॅशनल एज्युकेशन आयकॉन( नासा) डॉ. हेमाली जोशी उपस्थित होत्या. या मान्यवरांच्या हस्ते शिक्षिका प्रेरणा सराफ यांना गौरवण्यात आले. यामुळे जी .एस .हायस्कूल या शाळेच्या नवलौकिकात भर पडला आहे. त्यांचे शाळेकडून स्वागत करण्यात आले.