अवकाळी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना भरपाई द्यावी
अमळनेर (प्रतिनिधी ) जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना तत्काळ भरपाई देण्याची मागणी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांकडे भारतीय किसान संघातर्फे करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसान भरपाईसाठी अमळनेर येथे निवेदन देतांना भारतीय किसान संघ राष्ट्रीय उपाध्यक्ष कपिला मुठे, प्रांतकार्यकारिणी सदस्य मनोहर बडगुजर, अरविंद मुठे, अमळनेर तालुक्यातील सदस्य रतीलाल कोळी आदी उपस्थित होते.
