बारा गावांमध्ये ग्राम संरक्षण पथक स्थापन, सर्वांना लाठी, शिटी व ओळखपत्र वाटप

बारा गावांमध्ये ग्राम संरक्षण पथक स्थापन, सर्वांना लाठी, शिटी व ओळखपत्र वाटप


अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील बारा गावांमध्ये ग्राम संरक्षण पथक स्थापन करण्यात आले असून सर्वांना लाठी, शिटी व ओळखपत्र देण्यात आले. गावाच्या सुरक्षेसाठी या पथकाचा मोठा फायदा होणार आहे.
जळगांव जिल्हयातील ग्रामीण भागात वाढलेल्या चोऱ्या , जनावर चोऱ्या व घरफोडया यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी गावागावात ” ग्राम संरक्षण पथक ” स्थापन करण्येबाबत आदेश दिले होते. त्यासंबंधात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . राकेश जाधव यांचे अध्यक्षतेखाली वरील बारा गावांची बैठक पोलीस स्टेशनला घेण्यात आली . सर्वांना लाठी , शिटी व ओळखपत्र देण्यात आले आहे. प्रत्येक गावात रोज रात्री ०४ ग्राम रक्षक रात्री १२ ते सकाळी ०५:०० वाजे पर्यंत गस्त घालणार असून आजूबाजूच्या चार गावांचा मिळून एक व्हॉटसअॅप गृप तयार करुन त्याद्वारे सर्व ग्रामरक्षक एकमेकांशी संपर्क साधणार आहेत . या व्हॉटसअॅप गृपमध्ये सर्व अधिकारी , बीट अंमलदार , पोलीस पाटील , चालक व गावातील प्रतिष्ठीत नागरीक राहणार असून जनावर चोऱ्या , ईलेक्ट्रीक मोटर चोरी , ठिबक चोरी , इतर अवजारे , मोटार सायकल चोरी इत्यादी प्रकारांना प्रतिबंद करण्यास मदत होणार आहेत . वरील पथक स्थापन करण्यात सर्व गावांचे पोलीस पाटील , सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक यांच्यासह जानवे जवखेडा बीटचे अधिकारी पोउपनि गंभीर शिंदे अंमलदार कैलास शिंदे , हितेश चिंचोरे , जनार्दन पाटील , भुषण पाटील , योगेश महाजन तसेच प्रभारी अधिकारी, जयपाल हिरे , गोपनीय अंमलदार डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील , सिध्दार्थ सिसोदे यांनी ग्राम संरक्षण पथक स्थापन करण्यासाठी मेहनत घेतली आहे .

जाहीरात

या गावात ग्राम संरक्षण पथक स्थापन

अमळनेर पोलीस स्टेशनला मंगरुळ , शिरुड , जानवे , कावपिंप्री , वाघोदा , डांगर , रणाईचे , चोपडाई , कोंढावळ , चिमणपुरी , पिंपळे खु . , पिंपळे बु . , या बारा गावात ग्राम सरंक्षण पथकाचे कार्य सुरु करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *