श्रीक्षेत्र पाडळसरेत नाटेश्वर महादेवाच्या यात्रोत्सवात नवस फेड आणि पुजेसाठी भाविकांची हजेरी

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील श्रीक्षेत्र पाडळसरेत नाटेश्वर महादेवाच्या यात्रोत्सव निमित्त दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी लोटली होती. यावेळी नवस पूर्तीसह पूजेसाठी भाविकांनी हजेरी लावली. त्यानंतर रात्री तमाशाचा फड रंगला.
तालुक्यातील पाडळसरे येथील तापी, बोरी व अनेर नदीच्या त्रिवेणी संगमस्थळी असलेल्या पुरातन व जागृत देवस्थान म्हणून  श्रीक्षेत्र नाटेश्वर महादेव मंदिराची ओळख आहे. यात्रोत्सव निमित्त दर्शनासाठी महिला व आबालवृद्धांची सकाळपासून गर्दी उसळली होती, बेलपत्र व त्रिवेणी संगमाच्या नद्यांचा पाण्याने अभिषेक व पूजन करून नवसपूर्तीसाठी गावातील व बाहेर गावातील श्रद्धालूनी मंदिर परिसरात व गावात एकच गर्दी केली होती , दाल बट्टीचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून  महाप्रसाद वाटप करण्यात येत होता.

तगतरावची गुलाब व श्रीफळ वाहून पूजन

सायंकाळी ४ वाजता ग्रामपंचायत जवळ सरपंच शुभांगी पाटील व उपसरपंच शिवाजी अण्णा पाटील यांनी ट्रॅक्टरवर सजविण्यात आलेल्या तगतरावची गुलाब व श्रीफळ वाहून पूजन करून सजवलेला तगतराव नाटेश्वर महादेव मंदिर परिसरात नेऊन देवासमोर हजेरीचा कार्यक्रम सादर केला , शिवलींगावर बेलपत्र व श्रीफळ वाहून गावकऱ्यांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करून आपत्ती पासून रक्षणासाठी विनंती केली तर रात्री उशिरा लोकनाट्य तमाशाचे सादरीकरण करीत ग्रामस्थांचे मनोरंजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *