खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कर्नाटकातील कार्यकर्त्याच्या हत्येचा विहिंप, बजरंग दलातर्फे निषेध

अमळनेर (प्रतिनिधी)  कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्षा नामक कार्यकर्त्यांची करण्यात आलेल्या निघृण हत्येचा विश्व हिंद परिषद आणि बजरंग दलाने तीव्र निषेध व्यक्त करून राज्यपालांना निवेदन दिले आहे.
विश्व हिंद परिषद, बजरंग दलने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वांकडून झाल्याची आमची स्पष्ट धारणा आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ क्राटक पाटी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे काम म्हणजे ही हत्या आहे. भारतात घडलेल्या १९४६ च्या डायरेक्ट अॅक्शन तवर कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना जरब बसेल अशी शिक्षा व्हावी,  अशी विश्व हिंद परिषद मागणी केली आहे. तसेच  सिमीचेच दुसरे रुप असलेल्या पॉपूलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांवर व त्यांच्या नेतत्वावर बंदी घालावी आणि त्यांचा पायबंद करावा अन्यथा हिंदू समाज व हिंदू नेतृत्व त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे. कायदा कायद्याचे काम करेलच, परंतु यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेतृत्वाने याचा गांभिर्याने विचार करुन सुधरावे ही अपेक्षा आहे. तर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांची पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजलेले आहेत. त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशिर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल असा इशाराही  विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. निवेदनावर विहिंप जिला समरसता प्रमुख सुरेश पवार, शहराध्यक्ष अॅड. आप्पा उपासणी, प्रखंडमंत्री सचिन चौधरी, तालुकाध्यक्ष संजय विसपुते, मनोज मराठे, रमाकांत बोरसे, अक्षय कासार, पवन बारी आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button