अहिल्याबाई होळकर स्मारक भुमिपुजन सोहळा संपन्न…

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अमळनेर तालुका धनगर समाजच्या वतीने स्मारक भुमिपुजन सोहळा आयोजित करण्यात आला तसेच ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बस स्थानक चौकाला त्यांचे नाव देऊन नामकरण सोहळा पार पडला होता.
तालुक्यातील प्रत्येक गावातुन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावली होती.
या वेळी प्रमुख पाहुणे मा आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील यांनी उपस्थित राहुन राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व नगराध्यक्षा यांनी श्रीफळ फोडून भूमिपूजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन डी.ए.धनगर यांनी केले.तर यावेळी वसुंधरा लांडगे व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मनोज पाटील, शेखा हाजी, गोकुळ पाटील, साखरलाल महाजन,विक्रांत पाटील, निरज अग्रवाल, सुरेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला, तर या कामासाठी समाज बांधव, धनगर समाज कर्मचारी,संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष डी ए धनगर, न.पा. शिक्षण मंडळ अध्यक्ष नितीन निळे, व धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, मोहनभाऊ सातपुते,सरपंच निलेश बागूल,दशरथ लांडगे,चेतन देवरे,गोपाल हडपे,विलास लांडगे,सुधाकर पवार,समाधान धनगर,हरचंद लांडगे,साबे टेलर,धानोराचे ठाकरे,प्रदिप कंखरे,निरंजन पेंढारे,दिनेश भलकार,मनोज रत्नपारखी,
निलेश पवार,सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *