खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी २० फेब्रुवारीपासून कराटे प्रशिक्षण शिबिर

रोटरी क्लब, अमळनेर पत्रकार संघ आणि दामिनी पथकातर्फे आयोजन

अमळनेर (प्रतिनिध) विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी रोटरी क्लब, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आणि अमळनेर पोलिसांच्या दामिनी पथकांच्या सुयक्त विद्यमाने हिवाळी कराटे प्रशिक्षण शिबीराचे २० फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. डी. आर. कन्याशाळे जवळ, रोटरी हॉल, अमळनेर येथे दररोज सायंकाळी ६ ते ७ व ७ ते ८ या वेळेत शिबिर होणार आहे.
शिबिरात ज्यूदो कराटे, सिकई तायकांदो प्रशिक्षण १ महिना मोफत आहे, पण कराटे ड्रेस घेणे आवश्यक आहे. ज्युदो कराटे प्रशिक्षण मुला-मुलींसाठी आहे. यात वयाची अट नसून सातत्य आवश्यक आहे. शिबिरात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक शिबिरार्थीला ‘सन्मान पत्र’ व उत्कृष्ठ व्यायाम करणाऱ्याला ‘क्रीडा ट्रॉफी देण्यात येईल. शिबिरात प्रशिक्षण दिले जाणारे सर्वच खेळ ‘शालेय खेळ’ असल्यामुळे त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी कराटे ड्रेस आवश्यक आहे.  शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष वृषभ पारख, सेक्रेटरी प्रतिक जैन रोटे, प्रोजेक्ट चेअरमन योगेश येवले व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या शिबिरात मुख्य प्रशिक्षक एस. वाय .करंदीकर,  आंतरराष्ट्रीय खेळाडू मास्टर सुशिल करंदीकर आणि राष्ट्रीय खेळाडू प्रज्ञा करंदीकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिक माहितीसाठी (9226785560) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button