खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

नियमांचे उल्लंघन करून प्राचारार्थ बॅनर लावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी)  पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून खान्देश शिक्षण मंडळाच्या उमेदवारांचे प्रचारार्थ बॅनर लावून अतिक्रमण करीत शहर विद्रूपकरण केल्याने दोन डिजिटल बॅनर मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  गेल्या काही दिवसांपासून पुन्हा शहरात बेकायदेशीर डिजिटल बॅनर कुठेही लावून शहर भकास केले जात आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व  मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, गोपनीयचे डॉ. शरद पाटील, सिद्धात शिसोदे, सुनील पाटील, पालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल, जगदीश बिऱ्हाडे, जयेश गढरी यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने १२ रोजी दुपारी साडे अकरा ते अडीच वाजेच्या दरम्यान शहरात विविध ठिकाणी पाहणी केली असता स्टेट बँक ते प्रताप कॉलेजपर्यंत खान्देश शिक्षण मंडळ उमेदवरांचे प्रचाराचे बॅनर लागले होते. ते बॅनर वर्धमान डिजिटलचे कुमारपाल घेवरचंद कोठारी यांचे तर भद्रा मॉल ते उड्डाण पूलपर्यंत देखील बॅनर लागले होते ते बॅनर राजकुमार डिजिटल चे प्रवीण श्रीराम पाटील यांनी लावल्याची माहिती मिळाल्यावरून दोघांविरुद्ध महाराष्ट्र विद्रूपण कायद्याप्रणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button