तालुक्यातील गलेलठ्ठ पगार घेणारे अनेक “गुरू”-‘दारू’च्या गुत्त्यावर “विसावा” घेतात…

तर काहींचे पत्त्याच्या क्लब शिवाय पान हालत नाही…
शिक्षणाचा बट्ट्याबोळ, संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील अनेक शिक्षक दारूला चटावले असून बार मधील त्यांचा राबता लक्षणीय आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली तर कर्तव्यावर देखील मदिरा प्राशन करून मास्तर आलेले असतात.
शाळेचा वेळ झाला पटापट आण असा आदेश वेटर ला देत निर्लज्ज पणे ढोसलायला बसतात. त्यांच्या बैठकीतल्या कोमल गप्पा ध्वनिमुद्रित असून शाळेत जाताना बच्च पार्सल दे कोपरामा मारि लीसु , तठे कोण देखी राह्यन, आम्हणा हेडमास्टरच टाईट व्हयल रास असे अनेक गमतीदार किस्से दारूच्या गुत्यावर ऐकायला येतात व इतरांची मात्र करमणूक होते.
शिक्षणा सारखे पवित्र काम मदीरा पिऊन शिक्षण मंदीरात केले जाते हे निंदनीय असून स्वताच व्यसनी असलेला मास्तर दुसरी पिढी कशी घडविणार.?हा प्रश्न पडत आहे. तर दुसऱ्याच्या मालकी नावाने चक्क काही मास्तरांचाच स्वतःचा बिअरबार असावा..? काही मास्तर शाळा सुटल्यावर तर थोडा “विसावा” घेत इतके टाईट आणि फीट होतात की अनेकांना रिक्षा करून पोहचवावे लागल्याच्या रंजक सत्य कथा आहेत. अनेकांची दारूची उधारी वाढल्याने बार मालकांनी मोटार सायकली जप्त केल्याच्या चर्चा ताज्या आहेत. यातले काही पत्ते कुटत असतात क्लब मध्ये रात्रदिवस त्यांचा ठिय्या आहे शहरात काही दिवस पत्ते बंद झाले तर हे बहाद्दर एरंडोल,भडगाव,धुळे,पर्यंत जातात. असे बेवडे व सट्टा,जुगारी शिक्षकांवर संबंधित अधिकारी वर्गाने शिक्षकाचे ‘टाचन’ पाहण्यापेक्षा त्यांच्यावर टाच आणायला पाहीजे व समाजाने देखील अशा व्यसनी मास्तरांवर बहिष्कार टाकला पाहिजे. आपल्या शाळेतील शिक्षक व्यसनी आहे का..? याची प्रत्येक पालकाने खातर जमा केली पाहिजे असे सामाजिक स्तरातून आवाहन केले जात आहे. शिक्षकांच्या वाढत्या बैठका शिक्षण व्यवसायाला लागलेली कीड असून तिचे समूळ नायनाट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
खाजगी प्राथमिक,माध्यमिक,व महाविद्यालयीन सर्व प्रकारचे शिक्षक (गुरू)आढळून येत असून हा वाढत्या गलेलठ्ठ पगाराची विल्हेवाट लावायचा मार्ग तर नाही ना..? अशी शंका येते अनेक जणांचे दारू मुळे लिव्हर खराब झाल्याने भेंडा फेक्ट्री, दारू सोडणारे बुवा बाबा डॉक्टरी इलाज सुरू आहेत. यांचा परिवार शिव्या शाप देत हे बेवडे कसे ठिकाणावर आणता येईल असे म्हणत नवस बांधला आहे. अश्या सत्य व रंजक घटनेमुळे शिक्षण क्षेत्राची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *