खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्याब्रेकिंग

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाने हिजाब विरोधी कृत्याचा केला निषेध

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधी)  कर्नाटक येथे हिजाब न घालण्याच्या आदेशाला विरोध दर्शवित येथील राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाने निषेध केला. तसेच प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कर्नाटक राज्यात महाविद्यालयात मुस्लिम महिलांना हिजाब घालून येण्यास बंदी घालण्यात आल्याने देशात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. या निर्णया विरोधात मुस्लिम सह संविधान माननाऱ्यानी देशात ठीक ठिकाणी निर्देशने करीत असल्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. अमळनेरात ही राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष नविद शेख यांच्या नेतृत्वाखाली महामहिम राष्ट्रपतीसह देशाचे प्रधानमंत्री यांना प्रांताधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन हिजाब विरोधी कृत्याचा विरोध दर्शविला तर संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकाराचे हनन होत असल्याने त्याचे रक्षण करणे,हिजाब घालण्याला विरोध करणाऱ्या शैक्षणिक संस्थानां घटनेच्या कलम २५ नुसार ताकीद द्यावी,मुस्लिम विद्यार्थिनींना विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष नविद शेख, गुलाम नबी, सुलतान पठाण, शहीद शेख, अजर अली, जुबेर पठाण, अक्तर अली, शाबीर बागवान, नइम पठाण, मोहिज सय्यद, सलमान शेख, शोएब शेख, इम्रान अरब, अब्दुल मणियार आदी समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button