अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील न्यू प्लॉट भागात “न्यू प्लॉट विकास मंचच्या फलकाचे अनावरण आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विनोद पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जि. प. सदस्या जयश्री अनिल पाटील, बजरंगलाल अग्रवाल, डॉ. अनिल शिंदे, खाशि मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, कार्योपाध्यक्ष कल्याण पाटील, संचालक योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, नीरज अग्रवाल, हरी भिका वाणी, डॉ संदेश गुजराथी, प्रा. अशोक पवार, प्रकाशचंद पारेख, अॅड. एस. एस. ब्रह्मे, मकसूद बोहरी, प्रा सुभाषचंद्र सोमाणी, गणेश ठाकरे,संजय शिरोडे आदी उपस्थित होते. संपूर्ण न्यू प्लॉट भागातील जेष्ठ व तरुण मंडळींनी एकत्र येऊन न्यू प्लॉट परिसर विकास मंचची स्थापना केली असून यामाध्यमातून परिसरातील,विकासकामे, समस्यां, नागरिकांच्या अडचणी मार्गी लावून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत. डॉ संजय शाह यांनी मंचची कार्यकारिणी घोषित केली.
मंचची घोषित कार्यकारिणी अशी
अध्यक्ष-चेतन राजपूत, उपाध्यक्ष-बिपीन पाटील, प्रविण पारेख, सचिव-महेंद्र पाटील, कोषाध्यक्ष-डॉ संजय शाह, कार्यकारिणी सदस्य-प्रसाद शर्मा, पंकज मराठे, हार्दिक खिलोसिया, अॅड. विवेक लाठी, सौरभ जैन, अजीज बोहरी, तेजेन्द्र जामखेडकर, प्रशांत लंगरे, प्रतीक जैन, हृदयनाथ मोरे, सल्लागार-प्रकाशचंद्र पारेख, बजरंगलाल अग्रवाल, डॉ. शरद बाविस्कर, विनोद जैन, किरणकुमार जैन, मकसूद बोहरी, अनिल कासार, रघुनाथ पाटील, अमोल राणे, दिलीप ललवाणी, भरत कोठारी, मयूर सोनार, संजय शिरोडे, प्रेम शाह, वसंत पाटील, पर्यंक पटेल, जयप्रकाश पाटील, अॅड. एस. एस. ब्रह्मे.