गुणवत्ता पूर्ण शिक्षणावर दिलाय भर म्हणून खाशि संस्थांचा होतोय जागर
मीतभाषी प्रदीप अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी यांचा खाशितील कार्यकाळ राहिला चमकदार
अमळनेर (खबरीलाल विशेष) खान्देश शिक्षण संस्थेचा नावलौक सातासमुद्रापार आहे. यासाठी कोणत्या संचालकांनी कशी मेहनत घेतली आहे, हे दिसून येते आहे. हे पाहत असताना विद्यामान संचालक मीतभाषी प्रदीप अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी यांची नावे सर्रकन डोळ्यासमोर येतात. विरोधकांकडून टिका होत असली तरी त्याचे फारसे गांभीर्य न घेता आपल्या कामातून त्यांना उत्तर देणे हे या दोघांचे खास वैशिष्ट्ये आहे. आतापर्यंत या दोघांनी गुणवत्ता पूर्ण शिक्षणावर भर दिला आहे. म्हणून खाशि संस्थांचा जागर होत आहे. त्यांचा खाशितील कार्यकाळ जाणून घेतला असता केलेल्या कामाने विरोधक फिके पडतील, असे त्यांनी खबरीलालशी बोलताना सांगितले.
प्रदीप अग्रवाल मित भाषी, समन्वयकाची भूमिका खाशिच्या विकासाला पोषक
मितभाषी प्रदीप अग्रवाल, म्हणाले, संचालक आणि कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे. जी.एस. हायस्कूलला चेअरमन झाले. या शाळेत विद्यार्थी शालेय पोषण अहार मातीत बसून खात होते. त्यामुळे प्रथम तेथे पेव्हर ब्लॉक बसवले. तसेच शाळेची बंद पडलेली कम्प्युटर लॅबी व्यवस्थित सुरू केली. आएमए हॉल सु्स्थित केला. कोरोना काळात शासकीय यंत्रणेचा कामात आला. प्रताप कॉलेजचा चेअरमन झाल्यावर पी.बी.ए. इंग्लिश मीडिय स्कूलचे चेअरमन राहिलो. शाळेचे पालटलेले रुपडे पाहू शकतात. ई लर्लिंगचे काम सुरू आहे. संस्थेची प्रगती कोणत्याही मार्गाने घडत राहो. संचालकांमध्यै वैचारिक वाद निर्माण झाल्यास संस्थेच्या हितासाठी त्यांना एकत्र आणण्याची नेहमीच माझी समन्वयकाची भूमिका राहिली आहे. म्हणूनच आतापर्यंत चांगले काम करता आले आहे.
डॉ. संदेश गुजराथींकडे पाच टर्मच्या प्रदीर्घ अनुभवाची समुद्धी
डॉ. संदेश गुजराथी म्हणाले, सहाव्यांदा उमेदवारी आहे पाच वेळा सलग निवडूण आलो आहे. जनतेच्या आशीर्वाद निवडून आलो आहे. प्रदीर्घ अनुभव आहे. संचालक म्हणून सलग पाच पी.बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन पद भुषवले आहे. ३५२ अॅडमिशन होते. पहिले ते दहावीचे ठाण्याचे एक साफ्टवेअर डेव्हलप केले. ऑनलाइन शिक्षण सुरू केले. प्रत्येक स्कूलच्या क्लासरुमध्ये एलईडी टिव्ही लावले. नवीन नर्सरी केली. २ हजार स्केअर फुटचा हॉल उभारला. त्याला इंडोअर हॉल केला. तेथे खेळण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या. आरोप्लँट विद्यार्थ्यांसाठी आणला. नवीन बिल्डींगला कलर केले. कमर्चारी स्टाफसाठी ड्रेसकोड आणला. याचा सर्व फायदा असा झाला की, पाच वर्षात साडेअकराशे अॅडमिशन आहेत. संचालकांनी साथ दिल्यामुळे पुष्कळचे काम करू शकलो.
विरोधकांनी काय काम केले पटवून द्यावे
अजून पुढे खूप काम करायचे आहे. विरोधकांचे काम हे विरोध करण्याचे आहे. राजकारणात व समाजाकरणात विरोधक असतात. त्याच्यांपासूनही काही तरी नवीन करण्याची आयडिया मिळतात. ऐवढे काम करूनही विरोधक माझ्याविषयी बोलता पण वेळोवेळी त्यांनीही या संस्थेत चेअरमनशीप भोगलेली आहे. त्यामुळे त्यांनी काय काम केले हे आता पटवून द्यावे, असे आव्हानही डॉ. गुजराथी यांनी विरोधकांना केले आहे. मी काय काम केले आहे, हे मांडले आहे. बी.एस. आबा, कल्याण बापू यांनी चेअरमन असताना काय काम केले, ते त्यांनी सांगावे,असे ही ते म्हणाले.