खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

आरोग्य सेवेचे बळकटीकरण ग्रामिण रुग्णालयाचे होणार उपजिल्हारुग्णालय

आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नाने इमारतसाठी ७.३२ कोटी निधीस मान्यता

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णायाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ३० ऐवजी ५० खाटांची सुविधा मिळणार आहेत. यासाठी रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी ७.३२कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे शहरासह तालुक्याची आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत होणार आहे, यासाठी आमदार अनिल पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
कोविड कालावधीपासून आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर ग्रामिण रुग्णालयाकडे विशेष लक्ष केंद्रित केले होते. आमदारांच्या प्रयत्नाने रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध होऊन  85  लाख निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारला गेला,मात्र यादरम्यान रुग्णांसाठी बेड संख्या अपूर्ण पडल्याने इंदिरा गांधी भवनात अतिरिक्त बेडची व्यवस्था करावी लागली होती,याशिवाय बाहेरील तज्ञ व इतर जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांची मदत घेऊन रुग्णसेवा द्यावी लागली,यामुळे कुठल्याही परिस्थितीत या ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हारुग्णालयात रूपांतर करायचेच असा निर्धार आ.पाटील यांनी करून त्या दृष्टीने शासनदरबारी आरोग्य मंत्रालयाकडे जोमाने प्रयत्न सुरू केले होते,गेल्या आठ दिवसांपासून मुंबई मध्ये मंत्र्यांकडे ठाण मांडून सदर उपजिल्हारुग्णालयाच्या इमारतीसाठी तयार केलेल्या ७.३२ कोटीच्या अंदाजपत्रक व आराखड्यास आमदारांनी प्रशासकीय मान्यता मिळविल्याने इमारत बांधकामास हिरवा कंदील मिळाला आहे,सदर मान्यतेबाबत शासनाच्या आरोग्य विभागाने दि ८ फेब्रुवारी रोजी आदेश काढले आहेत.

 तज्ञ डॉक्टरांची टीम

 

अमळनेर ग्रामिण रुग्णालयात सद्यस्थितीत बऱ्यापैकी सोई सुविधा असल्या तरी तज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने अपघातग्रस्त किंवा गंभीर आजाराच्या रुग्णांना बाहेरगावचा रस्ता धरावा लागत असतो मात्र हेच उपजिल्हारुग्णालय परिपूर्ण झाल्यानंतर याठिकाणी सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध होणार असून उपचारासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक माशीनरीज व सोई सुविधा देखील उपलब्ध होणार आहे,याशिवाय स्टाफ ची देखील संख्या वाढून रुग्णालयाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

मार्च मध्ये होणाऱ्या बजेटमध्येच सदर निधी प्राप्त

येत्या मार्च मध्ये होणाऱ्या बजेटमध्येच सदर निधी प्राप्त करून तातडीने बांधकाम सुरू केले जाईल, असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. अमळनेर तालुका व मतदारसंघाच्या दृष्टीने हे अतिशय मोठे आणि आवश्यक काम आमदारांनी मार्गी लावले असून यामुळे अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना धुळे अथवा बाहेरगावी पाठविण्याचा पाठविण्याचा त्रास कायमचा बंद होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button