उत्सव समिती आणि आर्ट ऑफ लीव्हींग परिवारातर्फे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) उत्सव समिती आणि आर्ट ऑफ लीव्हींग परिवारतर्फे अमळनेर येथील चोपडा रोडवरील पांडवकालीन पुरातन मंदीर श्री वर्णेश्वर महादेव मंदीर येथे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्ताने यात्रा उत्सव आयोजीत करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात सकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम, मनोरंजन, झुले, पाळणे, दुकाने, स्टाॅल्स, इत्यादी आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाशिवरात्री निमित्ताने ” महारुद्र पुजा” आयोजन करण्यात आले आहे,पुजेचे मंत्रोच्चारासाठी , आर्ट ऑफ लीव्हींगचे बेंगलोर आश्रमातील वैदीक पंडीत आणि स्वामीजी येणार आहेत, नागरिकांनी सहभाग घ्यावा व सहकार्य करावे. तसेच महारुद्र पुजा व संकल्पा करिता इंजि. गिरीश सोनजी पाटील, प्रा. भराटे, बि. एन. पाटील, योगेश पिंगळे,संजय शुक्ल, सुभाष अण्णा चौधरी, ९७६७२२६०२२, ९५५२२०८३९७, ८९७५८७५३५६, ९४२२७८१२४२, ९४२२७८३३५७, यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.