मेडिकल कॉलेजसह पॅरामेडिकलचे कोर्सेसे, स्थानिक रोजगाराचे निर्माण होणार सोर्सेस  

मेडिकल कॉलेजसह पॅरामेडिकलचे कोर्सेसे, स्थानिक रोजगाराचे निर्माण होणार सोर्सेस  

 

डॉ.अनिल शिंदेंचे आहे वैद्यकीय व्हिजन ‘खाशि’ला प्राप्त होणार एक चांगले वजन

स्पष्ट वक्ता, योग्य निदानाचा आहे हातखंड डॉ. शिंदेंमध्ये योग्य उमेदवाराचे मापदंड

अमळनेर (खबरीलाल विशेष) मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात जाऊन मेडिकल कॉलेज आणि पॅरामेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी मुला, मुलींना जावे लागते. मात्र हेच शिक्षण त्यांना अमळनेरातच मिळाले तर त्यांचा राहण्या, खान्याचा खर्च वाचून सर्वसामान्यांची मुलेही वैद्यकीय क्षेत्रात स्थिरस्थावर होऊ शकतील, यासाठी ‘खाशि’च्या माध्यमातून मेडिकल कॉलेज आणि पॅरामेडिकल कोर्सेस उभारण्याचे व्हीजन असल्याची माहिती आशीर्वाद पॅनलचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी ‘खबरीलाल’शी संवाद साधताना दिली. यामुळे ‘खाशि’लाही एक वेगळे ‘वलय’ आणि ‘वजन’ निर्माण होणार आहे.
खान्देश शिक्षण मंडळाची निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ही सर्वसमान्यांची संस्था असल्याने यावर अनुभवी आणि एक चांगले व्हीजन असलेलाच व्यक्ती जावा ही प्रत्येक अमळनेकराची प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून यासंदर्भात आशीर्वाद पॅनलचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांची काय भूमिका आणि व्हिजन आहे, हे ‘खबरीलाल’ने जाणून घेतले. ते एक चांगले व्हिजन घेऊन ‘खाशि’ची उमेदवारी करीत आहे.

वैद्यकीय शिक्षण खाशिच्या वलयामुळे शक्य

डॉ. अनिल शिंदे म्हणाले, ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षित डॉक्टर मिळावे यासाठी मेडिकल कॉलेज आणि पॅरा मेडिकल कोर्सेससाठी नॅशनल मेडिकल कौन्सीलने (एनमसी) बऱ्याचशा अटी आणि शर्ती शिथिल केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय युर्निर्वसिटी झाली आहे. तेथून उद्योग, नोकर देणारे व्यवसाय आनण्याचे एक वेगळे व्हीजन आहे. तर खाशिचे वलय आणि नावलौकिक बघता मेडिकल कॉलेज आणि पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करणे सहज शक्य आहे. परंतु यासाठी खूप मेहनत असते. मान्यता घेण्यापासून ते  इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यापर्यंत जीव ओतून आणि जिद्दीने काम करावे लागते. ३० वर्षापासून आपण या क्षेत्रात असल्याने हे करणे माझ्यासाठी अशक्य काहीच नाही. यामुळे अमळनेरच्या नावलौकिकात भर पडून जीवनात आपल्यालाही अधिक काही चांगले करता आले, याचे मला समाधान असेल. तर या शिक्षणाचा फायदा सर्वांनाच होणार आहे. सर्वांशी समन्वय साधूनच हे करणार आहे. अधिक दर्जेदार काम होऊ शकते.

काय होईल फायदा

मेडिकल कॉलेज आणि पॅरा मेडिकल कोर्सेस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पास झाल्याबरोबर त्याच्या उपजिवेकीची सुविधा तो करू शकतो. गेल्या ३० वर्षापासून वैद्यकीय सेवेत आहे. रुग्णालयासाठी लागणाऱ्या नर्सेस, ऑपरेशन थेटरचे असिस्टन यांना आम्हालाच प्रशिक्षित करावे लागतात. तर यामुळे शिक्षणामुळे चांगले आणि प्रशिक्षित उमेदवार मिळू शकतील. त्यांना चांगला रोजगार आणि नोकरीही मिळू शकते. त्यामुळे सर्वसामान्यांची मुलेही मेडिकल फिल्डमध्ये आपले करिअर उभारू शकतील, याचे आपल्याला मनस्वी आनंद होईल.

‘खाशि’ची १ लाख ७० हजार स्वेकरफूट जागा क्रीडा संकुलाच्या घातली घशात ?

मेडिकल कॉलेज आणि पॅरा मेडिकल कोर्सेससाठी जागा आणि अर्थकारण हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टी खाशित उपलब्ध आहेत. ‘खाशि’ची १ लाख ७० हजार स्वेकरफूट जागा तत्कालीन सत्ताधारी असलेल्या विरोधकांनीच क्रीडा संकुलाला फुकट म्हणजे फ्री ऑफ कास्ट दिली आहे. बापू वाणी यांच्या कार्यकाळात जागा देण्याची समंती देण्यात आली तर डॉ. बी.एस.आबांच्या कार्यकाळात तिची प्रक्रिया राबवली तर विनोद भैय्या पाटील कार्यध्यक्ष असतांना थेट जागा देऊन मोकळे झाले. खरेतर खाशिसंदर्भात त्यांनी केलेला मोठा गंभीर “विनोद”च आहे.  ही महत्त्वाची जागा होती. त्यामुळे आज कामात आली असती खरे तर त्या जागेसाठी संस्थेने पैसे भरले होते. तरी ही त्यावेळी असा का निर्णय घेतला हे अकलनिय आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तरीही आता खाशिकडे असलेली जागा पुरेशी आहे. गरज पडल्यास समोरची किंवा आजूबाजूच्या जागा आपण घेऊन मेडिकल कॉलेज आणि पॅरा मेडिकल उभारले जाऊ शकते.

डॉ.अनिल शिंदे नावातच ब्रँड…..

डॉ. अनिल शिंदे यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहिले आहेत. त्यात आता राज्यात आघाडी सरकार आहे. त्यामध्ये काँग्रेसही आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांजवळ त्यांचे वजनही चांगले आहे. हे वजन वापरून मेडिकल कॉलेज आणि पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही. स्पष्ट आणि सडेतोड बोलणारा माणूस म्हणून त्यांची खास ओळख आहे. स्वतःची ऐवढी आबादाणी आहे. त्यामुळे ते खाशिवर आर्थिक लोभापोटी जात आहे, असे म्हणणे हास्यस्पद ठरेल. स्वतःचे एक वलय आहे. स्वतःच एक ब्रँड आहेत.

खाशिचा अनुभव जमेची बाजू

डॉ. अनिल शिंदे यांनी आधी खाशिवर संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे खाशिची एबीसीडी त्यांना शिकण्याची गरज नाही. त्यात राजकारणाचा दांडगा अनुभव आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने  खाशिला त्यांचा अधिकच फायदा होऊ शकते. तर वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी चांगल्या चांगल्यांचे अवघड ऑपरेशन सक्सेस केले आहे. त्यामुळे खाशिच्या विजयाचे ऑपरेशनही ते सक्सेस करतील, असा त्यांना विश्वास आहे.

सत्य परेशन होता है पराजित नही !

डॉ. अनिल शिंदे यांच्यावर इंदिरा गांधी यांच्या विचाराचा प्रभाव आहे. त्यामुळे ते कोणावर टिकाही करीत नाही, कोणाची रेषा खोडून आपली रेषा मोठी करण्याच्या भानगडीतही ते पडत नाही. आपलीच रेषा मोठी करण्यासाठी ते अनुभव आणि कष्टाने रक्ताचे पाणी करतात. कोणावर टिका, चिखलफेक करून तेवढ्यापुरते लोकांच्या डोळ्यात आपण धुळ फेकू शकतो. परंतु त्यानंतर डोळे स्वच्छ झाल्यावर त्यांनाही सत्य काय ते स्पष्ट दिसते. त्यामुळे सत्य काही काळ परेशान होते. परंतु पराजित होत नाही. त्यांनी आतापर्यंत चांगलीच कामे केली आहे. त्यामुळे त्यांना कोणाचाही विरोध नाही. म्हणून खाशिचे मतदारही सुज्ञ, सुशिक्षित, जाणकार असल्याने ते निश्चितच आशीर्वाद देतील, असा विश्वास डॉ. अनिल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *