ऑनलाईन कुबेर मटकाप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील तिघांना अटक
अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांनी ११ जानेवारीला छापा टाकून ऑनलाईन कुबेर मटक्यातील १८ जणावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील तीन जणांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ऑनलाईन कुबेर जुगारात अमळनेर सह राज्यातील विविध ठिकाणी तसेच ओरिसा व इतर राज्यातही एजंट सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळालेल्या दप्तरावरून प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मिलिंद भामरे , किशोर पाटील , सिद्धांत शिसोदे यांना पाठवून पिंपळगाव बसवंत येथील इस्माईल शेख , चेतन बाबुराव जावराव , तर ओझर येथील इम्तियाज पठाण याना अटक केली आहे.