दगडी दरवाज्याजवळ वाहतूक कोंडीमुळे दोन दुचाकीस्वार नाल्यात जाऊन पडले

दगडी दरवाज्याजवळ वाहतूक कोंडीमुळे दोन दुचाकीस्वार नाल्यात जाऊन पडले

अमळनेर (प्रतिनिधी) दगडी दरवाज्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याने होऊन दोघे जण दुचाकीसह नाल्यात जाऊन पडल्याची घटना ९ रोजी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. काम जलदगतीने होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
९ रोजी सकाळी पैलाड भागातील विनोद सोनवणे नावाचा तरुण व त्याचा मित्र मोटरसायकलवर पैलाड कडे जाताना वाहतुकीची कोंडी झाल्याने सरळ मोटरसायकल सह नाल्यात जाऊन पडले. सोनवणे यांचा डोक्याला मार लागला. रस्त्यावरील नागरिकांनी धावत जाऊन दोघांसह मोटरसायकल नाल्याच्या बाहेर काढली. दररोज होणाऱ्या किरकोळ अपघातामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कामाची मुदत संपूनही ठेकेदार काम करोत नसून दिरंगाई आणि रस्त्यात बांधकामाचे साहित्य तसेच पडलेले असल्याने नागरिकांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत. पुरातत्व विभाग , बांधकाम विभाग व नगरपालिकेने या समस्येकडे लक्ष घालून काम पूर्ण करून घ्यावे अथवा कारवाई करावी अशी मागणी नावेद शेख यांनी केली आहे.

ठेकेदाराकडून संथ गतीने काम

गेल्या काही महिन्यांपासून दगडी दरवाज्याचा बुरुज पडला असून हा दरवाजा देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आला आहे. पालिकेने बुरुजाची रस्त्याकडील रुंदी कमी करून ठेकेदाराला काम दिले आहे. मात्र ठेकेदार संथ गतीने काम करीत असल्याने दगडी दरवाज्याजवळ दगड व पाण्याचा टँकर रस्त्यात पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. एकाच वेळी दोन वाहने पास होताना अडचण होते. दरवाज्यासमोर खोल असलेला नाला असल्याने एकमेकांना वाहन घासणे , किरकोळ दुखापती ,वाहने ठोकले जाणे आदी घटना घडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *