गॅस भरताना कार पेटल्याने एक जण, गॅस भरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील जुन्या पोलीस लाईन जवळ ८ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अवैधरित्या गॅस भरताना कार पेटल्याच्या घटनेत एक जण जखमी झाला असून गॅस भरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्या पोलीस लाईन जवळ गॅस भरताना एक चार चाकी ने पेट घेतला आणि चार चाकी जळून खाक झाली. ११२ ला कॉल करून पोलिसांना माहिती कळवली असता मिलिंद भामरे व सुनील पाटील घटनास्थळी पोहचले . त्यांनी चौकशी केली असता अनिल सुरेश चौधरी हा अवैध रित्या ओमीनी वाहनात गॅस भरत असताना सिलिंडर चा स्फोट झाला. यात विनोद जानकीराम पारधी हे जखमी झाले. नगरपालिकेचा बम्ब आल्यानन्तर नितीन खैरनार , अरुण ठाकूर , जाबीर शेख ,बबलू खाटीक , मनोज पाटील यांनी आग विझवली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अनिल सुरेश चौधरी हा जय बिजासन माता स्वीट मार्ट मध्ये अवैध रित्या गॅस सिलिंडर बाळगून चार चाकिंमध्ये भरत असल्याची माहिती मिळल्यावरून सूर्यकांत साळुंखे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.