खाशिचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, पण अध्यक्षांची गोंधळाची स्थिती
अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र ते पुरते गोंधळले असून मतदारांमधील संभ्रम आणि नियोजनाबाबत त्यांनी उत्तर देणे टाळले आहे.
खान्देश शिक्षण मंडळाचे २३ जानेवारी रोजी होणारे मतदान २१ रोजी थांबवण्यात आले होते. म्हणजे दोनच दिवसाचा कालावधी बाकी होता. त्याच टप्प्यावर निवडणूक सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश होते.मात्र आता अध्यक्षांनी पत्र देऊन किमान पाच ते सहा दिवसाचा कालावधी दिला आहे. तसेच जिल्हाधिकारींनी १३ पासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सांगितले असता अध्यक्षांनी त्या आधीच प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्याने पत्राचा अर्थ अध्यक्षांना कळला नाही की राजकीय दबावात निर्णय घेतला याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.
तसेच जिल्हाधिकारींनी संस्थेत ५हजार ७८६ मतदार असल्याने सर्वांची आर टी पी सी आर चाचणी किंवा दोन डोस घेतल्याचे प्रमाण पत्र उपविभागीय अधिकारीकडे कोणी सादर करावे याबाबत उल्लेख केला नसल्याने मतदार संभ्रमात आहेत. आणि जर मतदार पॉझिटिव्ह आला तर त्याला मतदानापासून वंचित ठेवणार की त्याला मतपत्रिका घरी देणार याबाबत काहीच निर्णय नाही. आर टी पी सी आर चाचणीचा अहवाल ४८ तासांच्या आतील पाहिजे. मात्र सध्या शासकीय चाचण्यांचा अहवाल ४८ ते ७२ तासात येत आहे. त्यामुळे खाजगी चाचण्या केल्या तर खर्च मतदाराने करावा की संस्थेने करावा याबाबतही गोंधळ आहे. जर मतदार पॉझिटिव्ह असेल तर त्याला मतदान केंद्रात उपस्थित राहण्याची परवानगी नाही तर त्याच्या मतदानाच्या हक्काचे काय ? त्याला मतदानपासून वंचित ठेवणार का याबाबत अध्यक्ष अनिल कदम यांना विचारणा केली असता त्यांनी हा प्रश्न अवघड असल्याचे सांगितले मात्र निर्णय दिला नाही.
आरटीपीसीआर चा अहवाल येण्यास ४८ तास पेक्षा जास्त लागतो कालावधी
चाचणीचे ३ हजार किट उपलब्ध आरटीपीसीआर चाचणीचे ३ हजार किट उपलब्ध आहेत मात्र अहवाल येण्यास ४८ ते ७२ तास लागतात.
डॉ विलास महाजन , वैद्यकीय अधिकारी ,नगरपालिका रुग्णालय, अमळनेर