बाटलीत पेट्रोल न दिल्यामुळे तिघांचा पंप ऑपरेटवर स्टिलच्या रॉडने हल्ला

शहरात बोकळलेल्या गुंडगिरीच्या नांग्या पोलिसांनी वेळीच ठेचाव्यात

अमळनेर (प्रतिनिधी) बाटलीत पेट्रोल न दिल्यामुळे तिघांनी पेट्रोल पंपावरील पंप ऑपरेटला तिघांनी स्टिलच्या रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील शिव पेट्रोल पंपावर शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडली. यामुळे शहरात गुंडगिरी बोकळली असून पोलिसांनी त्यांच्या नांग्या वेळीच ठेचव्यात, अशी मागणी होत असून  याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहती अशी की, अमळनेर शहरातील शिव पेट्रोल पंप येथे शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पेट्रोल पंप ऑपरेटर पंकज सुरसिंग वानखेडे (रा. झाडी)  हा कामावर असतांना उमेश पाटील, यश पाटील आणि बाबू भगवान हे दुचाकीने आले व त्यांनी बाटलीत पेट्रोल मागितले. त्यावर ऑपरेटर पंकज वानखेडे यांनी बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिला. याचा राग येऊन तिघांनी शिवीगाळ करून पंपावरील स्टीलच्या रॉडने ऑपरेटर पंकजच्या डोक्यात मारले. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिघांनी पेट्रोल पंपावर घातलेला धुडगुसमुळे अन्य कर्मचारी धास्तावले आहे. दरम्यान, पंकज वानखेडे याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास  उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *