खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

झाडी येथे दोन एकरावरील मकाची डुकरांनी केली नासधूस

शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली तक्रार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील झाडी येथील शेतकऱ्याच्या दोन एकरावरील मकाचे डुकरांनी मोठी नासधूस केली यामुळे अधिकाऱ्यांनी दखल घेऊन डुकरांचा बंदोबस्त करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
तालुक्यातील झाडी येथील शिवाजी सुकलाल देवरे यांनी आपल्या शेतात दोन एकर मका पेरला असून डुकरांनी मोठ्या प्रमाणत नासधूस केली आहे. याबात त्यांनी  प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,  गलवाडे येथील डुकरांचे मालक बापू आनंदा पवार यांना वेळोवेळी तोंडी सांगितले होते. तरी सुद्धा लक्ष देत नसल्याने झाडी ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्व परवानगी  न घेता डुक्करे मोठ्या प्रमाणात सोडून जात आहे. यामुळे शेतकऱ्याचा पिकांचे तीन तेरा होत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने त्याची भरपाई मिळून डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button