खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

१४ वर्षाखाली  जिल्हा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अमळनेरचा वरूण पंकज पाटीलची निवड

संजय पवार नंतर १४ वर्षानी प्रथमच अमळनेरचा खेळाडूची लागली वर्णी

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षाखाली मुलांचा जळगाव जिल्हा संघची निवड करण्यात आली आहे. त्यात संजय पवार नंतर १४ वर्षानंतर प्रथमच अमळनरेचा वरुण पाटील याची कर्णधारपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा आयोजित करून १४ वर्षाखालील मुलांच्या जिल्हा क्रिकेट संघाची प्राथमिक निवड नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सराव शिबिर व दोन सराव सामने यांच्या माध्यमातून वीस जणांचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा संघाचे सामने अंबिशियस क्रिकेट क्लब पुणे, पूना क्लब, पुणे व सातारा जिल्हा क्रिकेट संघ यांच्याशी खेळले जातील. जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची निवड संजय पवार, संतोष बडगुजर व प्रशांत ठाकूर यांच्या निवड समितीने केली आहे, या संघाचे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे अध्यक्ष अतुल जैन, सचिव  अरविंद देशपांडे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

जाहीर करण्यात आलेला संघ असा

अमळनेर ढेकू रोड जिजाऊ नगर मधील वरुण पंकज पाटील (कर्णधार), मानस पाटील, राज राजपूत, तनय प्रसाद, श्लोक महाजन, दर्शन सोनवणे (यष्टीरक्षक), यश अग्रवाल, मोहित जगताप, आर्यन पाटील, प्रतीक शिंदे (उपकर्णधार), प्रणव जाधव, केशव ठाकुर, दिविक उपाध्याय, पियुष पवार, आदित्य वाणी, सोहम बडगुजर, अभय वाघमोडे, कृष्णा महाजन, जैनम जैन आणि आर्यन बडगे यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button