खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करून दिले नियुक्तीपत्र

अमळनेर (प्रतिनिधी ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची आढावा बैठकीत तालुका सरचिटणीस पदी प्रबोधिनी पाटील ,  तालुका उपाध्यक्षपदी भारती महेश शिंदे आणि शहर उपाध्यक्षपदी भारती  ससाने यांची नियुक्ती करण्यात आली.
या नवनियुक्त पदाधिकारीना नियुक्तीपत्र देण्यात आले.व सभासद नोंदणीस सुरवात करण्यात आली.
या बैठकीला  जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, अमळनेरच्या निरीक्षक अनिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील, धरणगाव निरिक्षक श्रीमती चावरीया, चोपडा निरीक्षक  योजना पाटील, पाचोरा निरीक्षक  कविता पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील आणि इतर  पदाधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.यावेळी यावेळी  सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष प्रा. मंदाकिनी भामरे  यांनी तर आभार मानले. शहराध्यक्ष अलकाताई पवार यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे सर्वांनी स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button