खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

रोटरी, विद्यार्थी परिषद आयोजित शिबिरात ५१ जणांचे रक्तदान

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे झालेल्या रक्तदान शिबिरात ५१ दात्यांनी रक्तदान केले.
अमळनेर रोटरी क्लब व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी वाढलेली रक्ताची गरज पाहता शिबिर घेतले. क्लबचे सदस्य अखिल भारतीय विद्या परिषद सदस्य व बुर्‍हानी गार्ड अमळनेर चे सदस्यांनी रक्तदान केले. पोलिस  शरद पाटील व डॉ. राहुल मुठ्ठे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात डॉ. राहुल मुठ्ठे  यांनी रक्तदान केल्याने काय फायदा होतात व तसेच शरद पाटील यांनी रक्तदान बाबत आपले मनोगत व्यक्त केले. क्लबचे अध्यक्ष ऋषभ पारख, सेक्रेटरी प्रतीक जैन, अभिजित भांडारकर, विवेक देशमुख, अजय रोडगे, योगेश येवले, महेश पाटील, कीर्तिकुमार कोठारी, ईश्वर सेनानी, आशिष चौधरी, अविनाश अमृतकर, रोहित शिंगवी, ताहा बुकवाला, विवेक देशमुख यांनी सहकार्य केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहर मंत्री अमोल पाटील व तालुका संयोजक केशव पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button