खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

‘खाशि’च्या निवडणुकीला ब्रेक लावणारा कळीचा नारद विनोद भैय्या पाटीलच !

खाशि’च्या निवडणुकीला ब्रेक लावणारा कळीचा नारद विनोद भैय्या पाटीलच !

काळ आणि परिस्थिती बदलण्यासाठी निवडणूक स्थगितीचा  ‘गेम ओव्हर’

खबरीलाल– अमळनेर – ऐन चार दिवस शिल्लक राहिलेल्या खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीला ब्रेक लागल्याने या निवडणुकीला स्थगिती आणणारा कळीचा नारद कोण, याचा शोध दोन्ही पॅनलकडून घेतला जात असतानाचा नारदाच्या शेंडीचा अँटेना सहकार पॅनलचे विनोद भैय्या पाटील यांच्याच डोक्यावर असल्याचे दिसून आल्याने तेच कळीचा नारद असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मतदारांसह अमळनेरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. निवडणूक झाली असती तर, निवडून येण्याचे कोणाच्या बुडात किती दम होता, हे लगेच दिसून आले असते. अजूनही घोडा मैदान दूर नाही, पण काळ लोटला जाईल. म्हणून परिस्थितीही बदलेल, म्हणूनच हा गेम ओव्हर केल्याचे आता लपून राहिलेले नाही, याचा हिशोब तर सुज्ञ मतदार चुकवतील, हे निश्चित आहे.  

“आशीर्वाद” म्हणते कळीचा नारद कळेल…

खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आशीर्वाद पॅनलच्या सर्व उमेदवारांनी प्रचार सुरू केले. त्यानंतर वेगवेगळ्या विषयसंबंधी प्रसार माध्यमातून बातमी येत होती, परंतु कोणत्याही विषयाला बळी न पडता   प्रचार सुरू ठेवले. साधारणता दहा दिवस अगोदर निवडणूक समितीने मीटिंग बोलावली त्या मिटिंगमध्ये आशीर्वाद पॅनलच्या सर्व उमेदवारांनी एकच मुद्दा मांडला की, जे  दिशानिर्देश द्याल त्याचे सर्व उमेदवार काटेकोरपणे पालन करू. फक्त कोणताही मतदार मतदानापासून वंचित नको, त्यानंतर निवडणूक समितीने पाठविलेले पत्रे सुद्धा सही करून दिले. आम्ही मागील तीन वर्षांमध्ये केलेले सर्व विकास कामांचे पत्रक सुद्धा प्रसिद्ध केले व ते प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले. सर्व मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील  अनुक्रमांकचे पत्रसुद्धा घरपोच पोहोचवण्याचे प्रयत्न केले. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक प्रक्रिया थांबवावी हे पॅनलच्या कोणत्याही उमेदवाराच्या विचारात ही नव्हते. त्यानंतर अचानक दिनांक १८ जानेवारी रोजी निवडणूक समितीने जिल्हाधिकारी जळगाव यांना निवडणूकची माहिती देण्यासंदर्भात पत्र तयार केले. सदरचे पत्र संस्था कार्यालयातून जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाला दाखल करण्यासाठी कोण घेऊन गेला याचा जर आपण तपास लावला तर निवडणुकीला स्थगिती आणणारा कळीचा नारद कोण हे आपल्याला कळेल, कारण सदरचे पत्र पाठवल्यानंतर निवडणुकीला स्थगिती देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे आदेश आले. आशीर्वाद पॅनलच्या कोणत्याही उमेदवाराला निवडणूकीला स्थगिती आणण्याची इच्छा अगोदर पण नव्हती व आत्ता पण नाही.

शिटी वाजली निवडणूक थांबली….!

सहकार पॅनलने एका स्थानिक दैनिकात जाहिरात देऊन खाशिच्या सभासदांनो जागते रहो, धोक्याची घंटा वाजली आहे…. सिटी वाजवा.. खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीला स्थगिती आणणारा कळीचा नारद कोण, असे म्हटले आहे. मुळात सहकार पॅनलच्या दिलीप अग्रवालांना सुरवातीलाच आशीर्वाद पॅनलने माघार घ्यायला लावून सुरूंग लावला होता. त्यात काही उमेदवार सोडले तर अन्य नवखे होते. त्यामुळे आपलीच निवडणुकीत सिटी वाजते की काय, अशी भिती सहकार पॅनलला वाटू लागली होती. त्यामुळे “खिरमा मुया” घालण्याचे काम सहकारमधीलच कळीच्या नारदाने ‘विनोदात’ केल्याचे पुढे आहे. आणि त्यातूनच शिटी वाजली निवडणूक थांबली…मतदार हो, जरा जपून दांडा धरा… अशी म्हणण्याची वेळ अमळनेरकरांवर आली आहे.  

विनोद भैय्यांना केला फोन ः पंडित चौधरी (निवडणूक समिती अध्यक्ष)

खाशिच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष पंडित चौधरी यांच्याशी खबरीलालने संवाद साधला असता ते म्हणाले, १७ तारखेला प्रशासक असलेल्या अधिकारी सीमा अहिरे यांच्या आदेशाने नगरपालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी येऊन २०१७ ची निवडणुकीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रांत म्हणून सीमा अहिरे यांनी निवडणुकीसाठी नव्याने परवानगी घेण्याचे पत्र खाशिच्या अध्यक्षांना दिले. मात्र अध्यक्ष आणि सचिव त्या दिवशी दोन्ही बाहेर गावी गेल्याने माय पावरमध्ये पत्र तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी सहकार पॅनलचे विनोद भैय्या पाटील यांना फोन करून गाडी आणि माणूस पाठवण्याचे सांगितले. त्यांनीही त्यांचा माणूस बाबू साळुंखे यांना पाठवले आणि पत्र दिले. याचा अर्थ विनोद भैय्यांना काय शिजतेय हे माहिती होते काय, का त्यांनीच हे मसाला लावून शिजवले, म्हणून तेच कळीचा नारद असल्याचे सर्व घडामोडींवर दिसून येते.  

अशीही बनवाबनवी.. कोण खरे कोण खोटे….!

एकाकडे पंडीत चौधरी हे खाशिचे अध्यक्ष आणि सचिव हे बाहेर गावी असल्याने आपण पत्र तयार करून पाठवले असे म्हणतात. तर दुसरीकडे विनोद भैय्या पाटील यांच्याशी खबरीलालने संवाद साधला असता ते म्हणता. माझा माणूस असाही जळगावल जात होता म्हणून त्यांच्या सोबत खाशिचे अध्यक्षही गेले. तसेच त्या पत्रावर अध्यक्षांचीही सही आहे. या दोघांच्या माहितीत तफावत असल्याने कशी बनवाबनवी सुरू आहे, हे उघड होते. तसेच कोण खरे आणि कोण खोटे, असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे विनोद पाटील यांनी गाडी आणि माणूस पाठवलाच का हा मूळ विषय आहे. ते सहकार पॅनलचे उमेदवार असताना त्यांनी हा प्रोटोकॉल पाळणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे न करता त्यांनी त्यांचे हित साधून घेतल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. त्यात बाबू साळुंखे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच उठबैस असल्याने तोंडी निरोपातून वेगळेच काहीतरी शिजवल्यानेच निवडणूक स्थिगितीची खिचडी करपल्याचे बोलले जात आहे.  


योगेश भाऊंची कलेक्टरांशी पडतात कामे…

विनोद भैय्या म्हणतात जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीला स्थिगिती दिल्यानंतर बीएस आबांच्या सूचनेनुसार दोन्ही पॅनल मिळून कोर्टात याचिका दाखल करून असे आशिर्वाद पॅनलच्या लोकांना सांगितल. मात्र आशीर्वाद पॅनलेचे योगेश मुंदडा यांनी यांना सपशेल नकार दिला. म्हणाले आम्ही कलेक्टांरांच्या विरोधात जाणार नाहीत, आमची त्यांच्याशी कामे पडतात. त्यामुळे अखेर सहकार पॅनलच्या दोघा उमेदवारांनी हायकोर्टात धाव घेतली. विनोद भैय्यांच्या म्हणण्यानुसार योगेश मुंदडा असे म्हटले असतील तर कलेक्टर काय त्यांची फुकटात कामे करतो, त्यांनी विनोद भैय्यांनाही का साथ दिली नाही, याचे उत्तर त्यांना मतदारांना द्यावेच लागणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button