खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

के. डी. गायकवाड विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमाला

खबरीलाल– अमळनेर (प्रतिनिधी) पैलाड येथील के. डी. गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान समितीतर्फे कर्तुत्वान महिला नेतृत्वावर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. व्ही. नेतकर यांनी केले होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. सी. तेले होते. राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या मुख्य उद्देश याविषयी प्रा. अशोक पवार यांनी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी मनोरंजनातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व शिकवण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत यांनी प्रश्नमंजुषाद्वारे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पेन म्हणून बक्षिसे दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. आर. पारधी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय  रुपाली ठाकूर यांनी करून दिला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक ए. व्ही. नेतकर,  गौतम मोरे, डी. एम. पाटील, व्ही. एन. ब्राह्मणकर, आ.बी. शेलकर, एम. आर. सोनवणे, एन.डी. विसपुते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एम.पी. पाटील यांनी केले.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button