खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेतर्फे उद्या पत्रकार दिन सोहळा

खबरीलाल- अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने गुरुवार दि ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर शहरातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाशेजारी पत्रकार संघाच्या नियोजित जागेत सकाळी १०.३० वाजता कार्यक्रम होईल.
तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी अमळनेर शहर व ग्रामीण भागातील तमाम पत्रकार बांधवानी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष चेतन राजपूत व सचिव चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button