खबरीलाल – अमळनेर (प्रतिनिधी) मद्य प्राशन करून वहन चालवणाऱ्या ४ जणांवर ड्रंक अँड ड्रॉईव्हची तर ३४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वर्षाखेरीस मद्य पार्टी करून वाहन चालकांवर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , पोलिस उपनिरीक्षक नरसिंग वाघ , हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे , हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील , योगेश महाजन , रामकृष्ण कुमावत , संजय पाटील , कैलास शिंदे ,सुनील हटकर यांनी कारवाई केली.यात रमेश नारायण धनगर (रा.ताडेपुरा),विनोद उत्तम पाटील (रा सानेनगर), मुरलीधर राजाराम पाटील (रा. पातोंडा) , गोरख आबा पाटील (रा. सानेनगर) यांनी दारू पिऊन वाहने चालवली म्हणून त्यांच्यावर ड्रक अँड ड्रॉईव्हचे गुन्हे दाखल करण्यात आले. सुभाष चौक, महाराणा प्रताप चौक, धुळे रोड आदी तीन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. ११३ वाहनांची तपासणी करण्यात आली. १५ एटीएम आणि दोन लॉज तपासण्यात आल्या. नियम मोडणाऱ्या , भरधाव वेगाने हयगय न करता चालवणाऱ्या २१ वाहनावर ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर १३ वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाई मुळे मद्यपी आणि दारुड्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्या तरुणांनी कारवाई सुरु होताच पळ काढला.